दत्तप्रसाद पेडणेकर यांना ''नृत्य सन्मान'' पुरस्कार

दत्तप्रसाद पेडणेकर यांना
''नृत्य सन्मान'' पुरस्कार

७५२६६
दत्तप्रसाद पेडणेकर यांना
‘नृत्य सन्मान’ पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
मसुरे, ता. ४ ः नृत्य क्षेत्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य शासनमान्य असलेली ''चिमणी पाखरं'' डान्स अॅकॅडमी, कुडाळ या संस्थेच्यावतीने मसुरे गावचे सुपुत्र पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते दत्तप्रसाद पेडणेकर यांना ''नृत्य सन्मान'' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पेडणेकर यांच्या नृत्य कार्यक्रम आयोजक व नियोजकप्रमुख, नृत्य परीक्षक, नृत्य विश्लेषण आदी नृत्य क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन नुकताच त्यांचा सुप्रसिद्ध रंगकर्मी तथा ज्येष्ठ पत्रकार प्रमोद ठाकूर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा कुडाळ मराठा समाज हॉल येथे नुकताच झाला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार शेखर सामंत यांसह रंगकर्मी केदार सामंत, केदार देसाई, साईनाथ जळवी, प्रणय तेली, अनंत जामसंडेकर, ''चिमणी पाखरं''चे सल्लागार सुनील भोगटे, अध्यक्ष रवी कुडाळकर, सुहास वरुणकर, राजा सामंत, वर्षा वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते. पेडणेकर हे नृत्य क्षेत्रात गेल्या २० वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत. सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रांतही ते नेहमी अग्रणी असतात. ''चिमणी पाखरं'' संस्थेच्यावतीने नृत्य सन्मान विशेष पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे मुंबई, मालवण आणि मसुरे गावातून आणि पत्रकार क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com