कणकवली : सावंत वाढदिवस

कणकवली : सावंत वाढदिवस

kan51.jpg
75268
कणकवली : येथील भगवती मंगल कार्यालयात झालेल्‍या कार्यक्रमात केंद्रीयमंत्री नारायण राणे, आमदार नीतेश राणे यांनी श्रींची मूर्ती देऊन संदेश सावंत यांचा सत्‍कार केला. यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व इतर मान्यवर उपस्थित होते. (छायाचित्र : संजय राणे, कणकवली)

शेवटच्या श्‍वासापर्यंत जनसेवा करणार
संदेश सावंत : केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते सत्‍कार
कणकवली, ता. ५ : विरोधकांनी अनेक प्रलोभने दाखवून मला फोडण्याचा प्रयत्‍न केला. पण नारायण राणे हाच माझा पक्ष आहे आणि त्‍या माध्यमातून मी शेवटच्या श्‍वासापर्यंत जनसेवा करत राहणार असल्‍याची ग्‍वाही युवा संदेश प्रतिष्‍ठानचे अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी दिली
येथील भगवती मंगल कार्यालयात युवा संदेश प्रतिष्‍ठानचे अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा वाढदिवस कार्यक्रम समीर नलवडे मित्रमंडळाच्या वतीने झाला. यात केंद्रीयमंत्री नारायण राणे, आमदार नितश राणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्री. सावंत यांचे अभीष्टचिंतन केले. या सत्‍काराला उत्तर देताना संदेश सावंत म्‍हणाले की, मला विरोधकांनी अनेक आश्वासनं दिली. तर काही सहकाऱ्यांनी विधान परिषदेत आमदार होण्याची इच्छा व्यक्‍त केली. जिल्हा परिषद सदस्य ते जिल्‍हा परिषद अध्यक्ष पर्यंत अनेक पदे भूषविली. पण पदांपेक्षा जनसेवेला माझे प्राधान्य आहे. नारायण राणे हाच माझा पक्ष असणार आहे.
श्री. सावंत यांच्या वाढदिनानिमित्त कै. सुधीर सावंत यांच्या स्मरणार्थ स्वर्गरथाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच रक्‍तदान शिबिर झाले. यावेळी केंद्रीयमंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, प्रभाकर सावंत, समीर नलावडे, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, मिलिंद मेस्त्री, अण्णा कोदे, संजना सावंत, विजय भोगटे, सुरेश सावंत, सुरेश ढवळ, सांगवे सरपंच संजय सावंत, सुनील घाडीगावकर, संतोष घाडीगावकर, सानिका गावकर, गणपत सावंत, मंगेश बोभाटे उपसरपंच प्रफुल्ल काणेकर, रॉबर्ट डिसोझा, पप्पू गावकर, विनोद सावंत, अनिल पांगम आदी उपस्थित होते.
भिरवंडे येथील निवासस्थानी ही भिरवंडे गावच्या वतीने ही त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी श्रीमती सुजाता सावंत, संजना सावंत, गणपत सावंत गुरुजी, मोहन सावंत, माजी चेअरमन संतोष सावंत, बद्रीनाथ सावंत, श्रीकांत सावंत, सुनिल सावंत सुभाष सावंत उपस्थित होते. तसेच माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशाळेच्या वतीनेही शुभेच्छा देण्यात आल्या मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी व शालेय समिती चेअरमन आर एच सावंत आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com