रोणापालमध्ये शिबिरात
३० जणांचे रक्तदान

रोणापालमध्ये शिबिरात ३० जणांचे रक्तदान

75276

रोणापालमध्ये शिबिरात
३० जणांचे रक्तदान
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ४ ः श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्कर्ष मंडळ, रोणापाल आयोजित रक्तदान शिबिरास ३० रक्तदात्यांनी सहभाग घेतला. हे रक्तदान शिबिर मंडळाचे अध्यक्ष प्रकाश गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त सलग दुसऱ्या वर्षी घेण्यात आले. प्रकाश गावडे, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुरेश पटवर्धन, सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्गचे जी.एम.सी. गोवा ब्लड बँक समन्वयक संजय पिळणकर, राजन परब, मडुरा माजी सरपंच उल्हास परब, सचिव विष्णू सावंत, ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर नेमण, माजी तंटामुक्त अध्यक्ष बाबल तुयेकर, डॉ. सागर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलनाने शिबिराचे उद्‍घाटन करण्यात आले. या रक्तदान शिबिरासाठी सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान व सावंतवाडी रक्तपेढीचे बहुमोल सहकार्य लाभले. यावेळी पिळणकर यांनी रक्तदानाबाबत मार्गदर्शन करून मंडळाचे कौतुक केले. उल्हास परब, प्रकाश गावडे, डॉ. पटवर्धन यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश गावडे यांनी, प्रास्ताविक सुदिन गावडे यांनी केले. उदय गावडे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com