-देसाई हायस्कूलतर्फे सूर्यनमस्कार स्पर्धा उत्साहात

-देसाई हायस्कूलतर्फे सूर्यनमस्कार स्पर्धा उत्साहात

३५ (पान ५ साठी)


- rat४p३१.jpg-
P२४M७५२५८
रत्नागिरी ः गोपाळ चौधरी यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारताना विसपुते शाळेचे विद्यार्थी.
-----------

देसाई हायस्कूलमध्ये सूर्यनमस्कार स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. ४ ः उंबर्डे (पेण, रायगड) येथील हिराबाई गावंड फाउंडेशन व येथील अ. के. देसाई हायस्कूलतर्फे रत्नागिरी येथे सूर्यनमस्कार स्पर्धा उत्साहात झाली. उदघाटनाला डॉ. स्वाती पाटील, सचिन सावंत देसाई, हिराबाई गावंड फाउंडेशनचे नरेंद्र गावंड, सचिव ज्योती गावंड, देसाई हायस्कूलच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा दळी, तेजल चव्हाण, केतकी जोशी-परांजपे उपस्थित होते.

स्पर्धेसाठी एक मिनिटाचा वेळ देण्यात आला होता. स्पर्धेत एका संघात १० विद्यार्थी प्रत्येक शाळेकडून सहभागी झाले होते. परीक्षकांनी सूर्यनमस्कारांचे योग्यरित्या परीक्षण करून निकाल जाहीर केला. विजेत्यांना हिराबाई गावंड फाउंडेशनतर्फे सन्मानचिन्ह व पारितोषिक, प्रमाणपत्र देऊन गोपाळ चौधरी यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
स्पर्धेचा निकाल अनुक्रमे असा ः सांघिक सूर्यनमस्कार- मातोश्री कमलाबाई विसपुते इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज कुवारबाव, महालक्ष्मी विद्यामंदिर खेडशी, सौ. गोदुताई जांभेकर विद्यालय. वैयक्तीक स्पर्धा- मुले ः मानस आंब्रे (एम. के. व्ही. इंग्लिश मीडियम स्कूल), मल्लेश गुरव (श्री महालक्ष्मी विद्यामंदिर खेडशी), सूरज पाल (देसाई हायस्कूल). मुली- किंजल गायकवाड (सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय), स्वराली रसाळ (एम. के. व्ही. इंग्लिश मीडियम स्कूल), महेश मुल्ला (देसाई स्कूल रत्नागिरी). सूर्यनमस्कार स्पर्धेत सात शाळा सहभागी झाल्या होत्या. ७० विद्यार्थ्यांनी २ हजारच्या वर सूर्यनमस्कार घालून स्पर्धेचा आनंद तुटला. सूत्रसंचालन संतोष गार्डी यांनी तर आभार विनोद गावखडकर यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com