''गोमू'' खेळातून शालेय साहित्याची खरेदी

''गोमू'' खेळातून शालेय साहित्याची खरेदी

swt47.jpg
75248
साळिस्तेः जिल्हा परिषद शाळा नंबर १ मधील मुलांनी काढलेल्या ‘गोमू’ खेळात मिळालेल्या रकमेतून विविध शैक्षणिक साहित्य घेतले. (छायाचित्र : एन. पावसकर)

‘गोमू’ खेळातून शालेय साहित्याची खरेदी
साळिस्ते शाळेचा उपक्रमः मुलांनी दिला संस्कृती जतनाचा संदेश
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ४ : कोकणातील शिमगोत्सवात परंपरागत असलेला गोमूचा खेळ काढत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा साळिस्ते नंबर १ च्या मुलांनी उत्सव आनंददायी साजरा केला. यातून मिळालेल्या रकमेतून विद्यार्थांसाठी शैक्षणिक साहित्य घेण्यात आले. एकीकडे लोकपरंपरा टिकवत विद्यार्थ्यांचे आवश्यक शैक्षणिक साहित्य घेतल्याने मदतही झाली. यासाठी सर्व शिक्षकांसह पालक आणि ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले.
कोकणातील महत्त्वाचा उत्सव म्हणजे शिमगा. हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. शिमग्यात घरोघरी पारंपरिक गोमूचा नाच गावागावांत सादर केला जातो. याचेच औचित्य साधून शाळा साळिस्ते नं. १ च्या विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या सहभागातून घरोघरी जाऊन गोमूचा नाच करायचे ठरविण्यात आले. त्यानुसार ''गोमू'' म्हणजेच स्त्री व्यक्तिरेखा समर्थ सुतार व अनिश ताम्हणकर यांनी साकारली. गायन यश गुरव आणि ढोलकी वादन सार्थक गुरव यांनी केले.
या गीतांमधून कोकणातील पारंपरिक संस्कृती जतन केली जाते. या सणाचे महत्त्व अशा गाण्यांतून विशद केले जाते. ''खेळे येती, वचन देती, तुम्ही नांदा सुख समृद्धी'' अशा प्रकारे सुख-समृद्धी घरोघरी नांदावी, अशी प्रार्थना केली जाते. या खेळादरम्यान वेगवेगळ्या वेशभूषा केल्या जातात. यातून मुलांनी कोकणची लोप पावत चाललेली संस्कृती, परंपरा यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न प्रयत्न केला आहे. आपली कोकण संस्कृती जपतानाच ती पुढच्या पिढीलाही ज्ञात व्हावी, यासाठी प्रयत्न केला. गोमूचा नाच या उपक्रमामुळे या शाळेच्या विद्यार्थ्यांनी चार हजार रुपये जमवले. त्यातून त्यांनी शैक्षणिक साहित्य खरेदी केले. त्यामध्ये कंपास बॉक्स, रंगपेटी, ड्रॉईंग पेपर अशा साहित्याचा समावेश आहे.

चौकट
मुलांना उपक्रमातून ''कमवा व शिका''चे धडे
या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी ''कमवा व शिका'' या तत्त्वाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केंद्रप्रमुख गोपाळ जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समीर ताम्हणकर, उपाध्यक्ष गजानन रामाणे यांनी केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सत्यवान घाडीगावकर, पदवीधर शिक्षक संजना ठाकूर, सीताराम पारधिये, उपशिक्षक संगीता वळवी व माधवी बुचडे यांनी विशेष प्रयत्न केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com