बांदा शाखा कालव्याचे पाणी ५ मेपर्यंत बंद

बांदा शाखा कालव्याचे पाणी ५ मेपर्यंत बंद

बांदा शाखा कालव्याचे
पाणी ५ मेपर्यंत बंद
सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. ४ः तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या बांदा शाखा कालव्यातील पाणी सोमवारपासून (ता. ८) ५ मेपर्यंत बंद करण्यात येणार आहे. तशा सूचनांचे पत्र संबंधित यंत्रणेकडून ग्रामपंचायत कार्यालयाला देण्यात आले आहे.
तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या बांदा शाखा कालव्यातून नेतर्डे, बांदा, वाफोली, विलवडे, सरमळे, ओटवणे, इन्सुली, निगुडे आणि रोणापाल अशा कालव्यांतून पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे संबंधित गावातील पाणलोट क्षेत्रातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली. याच पाण्याच्या उपशावर शेतकऱ्यांनी पालेभाज्यांची शेती पिकविली; मात्र सध्या धरणातील पाण्याचा कमी साठा तसेच पाऊस लागण्याचा अनिश्चित कालावधी पाहता हे पाणी मेपर्यंत राखून ठेवण्यासाठी संबंधित कालव्यातील पाणी बंद करण्याचे ठरविण्यात आले. पाऊस लांबल्यास मेमध्ये पाणी सोडता यावे, याच्या नियोजनासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामस्थांनी याची दखल घ्यावी, असे आवाहन उपविभागीय अभियंता (तिलारी कालवा उपविभाग क्र. १, कोनाळकट्टा) यांच्याकडून करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com