-परवानग्याविना मदरशात विद्यार्थी ठेवू नका

-परवानग्याविना मदरशात विद्यार्थी ठेवू नका

४१ (पान ३ साठी, महत्वाची)

परवानगीविना मदरशात विद्यार्थी ठेवू नका

राजापुरात प्रांताधिकाऱ्यांचे आदेश ; शैक्षणिक वर्षअखेर घरी सोडण्याच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ४ ः शहरानजीकच्या धोपेश्वर ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील पन्हळे येथील मदरशाच्या योग्य त्या शासकीय परवानग्या घेतल्याशिवाय मदरशामध्ये विद्यार्थी ठेवू नयेत. सध्या या ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्यांच्या घरी सोडण्यात यावे असे आदेश प्रांताधिकारी वैशाली माने यांनी दिले आहेत. या ठिकाणी कायदा व सुव्यस्थेचा भंग होणार नाही यासाठी पोलिस विभागाने आवश्यक ती कार्यवाही करावी व पोलिस विभाग व शिक्षण विभाग यांनी सखोल अहवाल कार्यालयाकडे सादर करावा, असेही त्यांनी आदेशात म्हटले आहे.
धोपेश्वर ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील पन्हळे येथील अनधिकृत मदरसा बंद करण्यात यावा यासाठी पन्हळे येथील अमोल सोगम यांच्यासह ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिनी उपोषण छेडले होते. यावेळी येथील तहसीलदार शीतल जाधव यांनी या संदर्भांत मार्च महिन्यात बैठक घेवून निर्णय देण्याचे आश्वासित केले होते. त्यानंतर, उपोषण मागे घेण्यात आले होते. त्यानुसार १ मार्च २०२४ रोजी प्रांताधिकारी श्रीमती माने यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला तहसीलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे प्रतिनिधी, पोलिस निरीक्षक, गटशिक्षणाधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, धोपेश्वर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी, सरपंच व सदस्य तसेच दारूल हबीब जनरल एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर ट्रस्टचे अध्यक्ष निझाम काझी व सदस्य जमीन मालक अकबर अब्दुल दादन आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाल्यानंतर प्रांताधिकारी श्रीमती माने यांनी या मदरशाबाबत लेखी आदेश जारी केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com