कोल्हापूर

कोल्हापूर

कृतीतून शिका, व्यावसायिकदृष्ट्या फरसाण मेकिंगसह
नमकीन मेकिंग, नावीन्यपूर्ण चिवड्याचे विविध प्रकार
कोल्हापूर येथे ७ व ८ एप्रिलला विशेष प्रशिक्षण
कोल्हापूर, ता. ४ ः सद्यस्थितीमध्ये अन्नप्रक्रिया उद्योगाला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे, फरसाण व नमकीन मेकिंग हा नावीन्यपूर्ण व्यवसाय आहे. या अनुषंगाने विविध प्रकारचे फरसाण, नमकीन, ड्राय स्नॅक, चिवडे आणि विविध प्रकारचे नावीन्यपूर्ण खाकरे, याचे प्रशिक्षण सकाळ-ॲग्रोवन संलग्न शैक्षणिक संस्था एसआयआयएलसी तर्फे कोल्हापूर येथे, ७ व ८ एप्रिलला आयोजित केले आहे.

प्रशिक्षणामध्ये काय शिकवले जाईल
शेवचे प्रकार ः साधी शेव, लसूण शेव, पालक शेव, आलू भुजिया, मसाला शेव
चिवड्याचे प्रकार ः महाराष्ट्रीयन चिवडा, पालक चिवडा, मका चिवडा, डायट चिवडा, दालमोड, गुलमोहर चिवडा, रोस्टेड चिवडे आणि डायट चिवडे त्याचे नावीन्यपूर्ण प्रकार.

फरसाण आणि फरसाणचे प्रकार
गाठी, पापडी, खारी बुंदी, खारीडाळ, मुगडाळ, ड्राय समोसे, ड्राय कचोरी, बटर चकली, पालक चकली, तिखट चकली, फ्लेवर्ड मकाना, पेरी पेरी मकाना, बाकरवडी, प्लेन खाकरा, मसाला खाकरा, पालक खाकरा, नाचणी खाकरा, मीलेट खाकरा, मेथी खाकरा, पेरी पेरी खाकरा, पिझ्झा खाकरा आणि खाकराच्या नावीन्यपूर्ण पद्धती शिकवल्या जातील.

तसेच या प्रशिक्षणामध्ये ब्रँडिंग, पॅकिंग, लायसनिंग, कॉस्टिंग तसेच हे व्यवसाय करण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गोष्टी आणि शासकीय अनुदानाची माहितीदेखील दिली जाणार आहे. चहा, जेवण, नोट्स व प्रमाणपत्रासह शुल्क ४००० रुपये राहील.

तारीख ः ७ व ८ एप्रिल २०२४
स्थळ ः सकाळ कार्यालय, शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर
संपर्क ः ९३५६९७३४२७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com