raigad news
raigad news sakal

Raigad News: आता रंगणार रायगडची लोकसभा निवडणूक, आठ जणांनी घेतली माघार!

Raigad: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या तिसऱ्या टप्प्यासाठी रायगड लोकसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर १३ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमोर स्वतः उपस्थित राहून एकूण २१ वैध उमेदवारांपैकी आठ जणांनी माघार घेतली, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहामध्ये निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती देताना पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाधिकारी जावळे बोलत होते. या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे आदी उपस्थित होते.

रायगड लोकसभा मतदार संघात १३ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. त्यामध्ये अनंत पद्मा गीते (अपक्ष, गळ्याची टाय), अनंत बाळोजी गीते (अपक्ष, चिमणी), अनंत गंगाराम गीते, (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे, मशाल), नितीन जगन्नाथ मयेकर (अपक्ष, पत्रपेटी), मंगेश पद्माकर कोळी (अपक्ष, मनुष्य व शिडी युक्त नाव), प्रकाश बाळकृष्ण चव्हाण (भारतीय जवान किसान पार्टी, भेटवस्तू), पांडुरंग दामोदर चौले (अपक्ष, जहाज), सुनील दत्तात्रेय तटकरे (नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी, घड्याळ), श्रीनिवास सत्यनारायण मट्टपरती (अपक्ष, हिरा), अजय यशवंत उपाध्ये (अपक्ष, ऑटो रिक्षा), अंजली अश्विन केळकर (अपक्ष, बेल्ट), अमित श्रीपाल कवाडे (अपक्ष फुलकोबी),

कुमोदिनी रवींद्र चव्हाण (वंचित बहुजन आघाडी, प्रेशरकुकर) यांचा समावेश आहे. तसेच सुनिल दत्ताराम तटकरी (अपक्ष), आस्वाद जयदास पाटील, अभिजित अजित कडवे (अपक्ष), नंदकुमार गोपाळ रघुवीर (लोकराज्य पार्टी ), मिलिंद काशिनाथ कांबळे (बहुजन समाज पार्टी आंबेडकर), विजय गोपाळ बना (अपक्ष), गोपाळ यशवंतराव तंतरपाळे (अपक्ष), अस्मिता एकनाथ उंदिरे (अपक्ष) या ८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात ३२ रायगड लोकसभा मतदार संघात ७ मे रोजी मतदान होणार आहे. तर ४ जूनला मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com