नवनिर्माण महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन

नवनिर्माण महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन

१३ (टूडे ३ साठी)
-----------
- rat२४p१.jpg -
२४M७९४७६
संगमेश्वर ः नवनिर्माण महाविद्यालयातील आयोजित ग्रंथ प्रदर्शन.

नवनिर्माण महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २५ ः विद्यार्थ्यांनी आपला वेळ ग्रंथालयात घालवावा तसेच पुस्तके वाचून आपले ज्ञान अद्ययावत करावे असे सांगितले. प्राचार्य डॉ. संजना चव्हाण म्हणाल्या, पुस्तके मार्गदर्शक असतात. आपण विकत घेतलेली पुस्तके वाचून झाले की, ती घरात न ठेवता ग्रंथालयाला दान करावीत जेणेकरून त्या पुस्तकांचा इतरांना फायदा होईल, असे प्राचार्या प्रज्ञा कदम यांनी सांगितले.
नवनिर्माण महाविद्यालय संगमेश्वर येथे आयोजित जागतिक पुस्तकदिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शनावेळी बोलत होत्या. या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. संजना चव्हाण, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रज्ञा कदम, प्रा. संतोष खरे, पृथ्वीराज वाडकर, गौरी भोसले आदी उपस्थित होते. या वेळी प्रास्ताविकात ग्रंथपाल भोसले यांनी जागतिक पुस्तकदिन साजरा करण्यामागील महत्व सांगत जागतिक किर्तीच्या लेखकांनी पुस्तके लिहिली त्यामुळे आम्ही पुस्तके वाचत आहोत, असे सांगत पुस्तके वाचण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अनिल नेमण यांनी केले तर आभार पृथ्वीराज वाडकर यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com