सावंतवाडीत शिवसेनेतर्फे व्हॅनिटी व्हॅनचा प्रारंभ

सावंतवाडीत शिवसेनेतर्फे व्हॅनिटी व्हॅनचा प्रारंभ

swt253.jpg
79743
सावंतवाडीः व्हॅनिटी व्हॅनचे उद्घाटन करताना मंत्री दीपक केसरकर. सोबत जिल्हाप्रमुख अशोक दळवी, महेश सारंग, गुणाजी गावडे व अन्य.

सावंतवाडीत शिवसेनेतर्फे
व्हॅनिटी व्हॅनचा प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ः लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराकरिता मागविण्यात आलेल्या व्हॅनिटी व्हॅनचा प्रारंभ शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून ‘महायुतीचा विजय असो’ अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
दरम्यान, मंत्री केसरकर आजपासून गावागावांत प्रचार सुरू करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर व्हॅनिटी व्हॅनचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, प्रभारी तालुकाप्रमुख गुणाजी गावडे, महिला जिल्हाप्रमुख अॅड. नीता सावंत, नंदू शिरोडकर आदी उपस्थित होते. शिंदे सेनेकडून स्टार प्रचारक म्हणून मंत्री केसरकर यांना व्हॅनिटी व्हॅन देण्यात आली आहे. ही व्हॅन आजपासून तालुक्यात फिरणार आहे. गावागावांमध्ये प्रचारासाठी या व्हॅनचा वापर करणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com