फोंडाघाट देव वाघोबाचा रविवारी वार्षिक कार्यक्रम

फोंडाघाट देव वाघोबाचा रविवारी वार्षिक कार्यक्रम

swt255.jpg
79757
श्री देव वाघोबा

फोंडाघाट देव वाघोबाचा
रविवारी वार्षिक कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २५ : फोंडाघाट-गांगोवाडी येथील श्री देव वाघोबा मंदिरामध्ये रविवारी (ता. २८) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. श्री देव वाघोबा क्रीडा, सांस्कृतिक बहुउद्देशीय मंडळ, फोंडाघाट यांच्यावतीने हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाचे हे दहावे वर्ष आहे. श्री देव वाघोबा चरणी असंख्य भक्त भक्तिभावाने आणि पूर्णपणे येतात. दरवर्षी या ठिकाणी विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांनी उत्सव साजरा केला जातो. रविवारी सकाळी ८ वाजता देव वाघोबा पूजन, श्री गणेश पूजन, ९.३० वाजता श्रींची महापूजा, आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १ वाजता महाप्रसाद, ३ वाजता हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी ५ वाजता नकुल गोसावी यांचे सुश्राव्य भजन, ६ वाजता हरिपाठ व महाआरती, रात्री ८ वाजता भरत मोरे यांचे भजन, ९ वाजता स्वरधारा भजन मंडळ, तांबोळीचे बुवा अमित तांबोळकर यांचा कार्यक्रम, १२ वाजता स्थानिक भजने सादर होतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com