राऊतांनी विकासाची ब्लू प्रिंट द्यावी

राऊतांनी विकासाची ब्लू प्रिंट द्यावी

दोन बातम्या शेजारी शेजारी घेणे

swt257.jpg
79765
कणकवलीः पत्रकार परिषेदेत बोलताना प्रमोद जठार शेजारी शिशिर परूळेकर, बबलु सावंत आदी.

राऊतांनी विकासाची ब्लू प्रिंट द्यावी
प्रमोद जठारः रोजगार हिसकावण्याचे काम
सकाळ वृत्तसेवा
कणकवली.ता. २५ः विकासाच्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करणारे खासदार विनायक राऊत यांनी या मतदारसंघाच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट आधी प्रसिद्ध करावी. केवळ विरोध करून इथल्या तरुणांच्या हातातला रोजगार हिसकावण्याचे काम राऊत यांनी केले आहे. गेल्या दहा वर्षात त्यांनी एकतरी प्रकल्प आणला का, ते दाखवावे. जर या मतदारसंघाचे वजन कायम टिकवायचे असेल तर आता नारायण राणे यांच्याशिवाय पर्याय नाही, असा दावा माजी आमदार प्रमोद जठार यांनी आज येथे पत्रकार परिषदेतून केला.
येथील भाजप संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला शिशिर परुळेकर, बबलू सावंत आदी उपस्थित होते. श्री. जठार म्हणाले, "केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या रूपाने या लोकसभा मतदारसंघाला वजनदार उमेदवार मिळाला आहे. बॅ. नाथ पै, मधु दंडवते आणि सुरेश प्रभू यांनी दिल्लीच्या गादीवर आपला ठसा उमटवला तसा उमटवण्यासाठी पुन्हा एकदा मतदारांच्या हातात संधी आली आहे. जर आपल्याला या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर सत्तेतील खासदाराची गरज आहे. राणेंना निवडून देण्यासाठी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी चंग बांधला आहे. त्यामुळे जाहीर सभाही आयोजित केल्या असून उद्या (ता.२६) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुपारी एक वाजता राजापूरला सभा होणार आहे. त्यानंतर १ मे रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची कुडाळ येथे जाहीर सभा होणार आहे. गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा ३ मे रोजी रत्नागिरी येथे आयोजित केली आहे. उद्याच्या सभेला बुथवरून येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी दुपारी १२ वाजता राजापुरात पोहचावे. ही सभा अगदी नियोजित वेळेतच सुरू होणार आहे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘या मतदारसंघाला निधी कमी पडू देणार नाही. मतदारसंघातील १३ तालुक्यांमध्ये जवळपास पंधराशे कोटीची जलजीवन योजनांसाठी निधी आलेला आहे. मुंबई-गोवा महामार्गासाठी मोदी सरकारने पंधराशे कोटी रुपये दिले. चौपदरीकरणाचे काम गतीने सुरू आहे. या चौपदरीकरणातील महामार्गावरील संगमेश्वर, राजापूर, लांजा या बाजारपेठेंचे प्रश्न खासदार राऊत यांनी कधीच सोडवले नाहीत. आम्ही गेल्या चार वर्षात तेथील नागरिकांच्या समस्या सोडवल्या आहेत. या मतदारसंघात ३ लाख कोटीचा प्रकल्प राऊत यांनी अडवला आहे. त्यामुळे ते नेमका कोणता विकास करणार ?, विकासाचे व्हिजन काय ?, ग्रीन रिफायनरी प्रकल्प नको असेल तर तुम्ही कोणता प्रकल्प आणणार ? या प्रकल्पाशिवाय दुसरा कोणता प्रकल्प आहे का ?, जर तुमच्याकडे विकासाची ब्लू प्रिंट असेल तर ती तुम्ही जाहीर करा. प्रकल्पाला विरोध करायचा आणि नंतर प्रकल्प आल्यानंतर सेटलमेंट करायची, हीच त्यांची पद्धत आहे. म्हणून कोकणचा खंबाटा होईल.’’


swt256.jpg
79764
सावंतवाडीः महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचाराच्या समर्थनार्थ शहरात काढण्यात आलेली मशाल फेरी.

खरी शिवसेना म्हणणाऱ्यांचा निवडणूकीतून पळ
वरुण सरदेसाईः सावंतवाडीत शिवसेनेची फेरी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ः बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना म्हणणाऱ्यांनी कोकणातून शिवसेना हद्दपार केली आहे. खरी शिवसेना असती तर त्यांनी निवडणुकीतून पळ का काढला?, असा सवाल उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी येथे केला. कोकणात विनायक राऊत तिसऱ्यांदा हॅट्रिक करणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शहरात आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून फेरी काढण्यात आली. याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शहरातील कवळीतिठा ते शिव उद्यान अशी ही फेरी काढण्यात आली. यात श्री. सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी ''कोकणचा खासदार कैसा हो, विनायक राऊत जैसा हो'' अशा घोषणाही देण्यात आल्या. या फेरीमध्ये माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते, समीर वंजारी, ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी तालुका संपर्कप्रमुख शैलेश परब, गितेश राऊत, रुची राऊत, महिला जिल्हाप्रमुख जानवी सावंत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, काँग्रेसचे अॅड. दिलीप नार्वेकर, तालुकाप्रमुख महेंद्र सांगेलकर, ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, राष्ट्रवादीचे तालुकाप्रमुख पुंडलिक दळवी, बाब्या म्हापसेकर, सुनील गावडे, राघवेंद्र नार्वेकर, विनोद ठाकूर, शिवदत्त घोगळे, रश्मी माळवदे, सायली दुभाषी, महेश शिरोडकर, सागर नाणोसकर आदी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
फेरीची सांगता झाल्यानंतर श्री. देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘कोकणात शिवसेना वाढली. मुंबईतही शिवसेना वाढविण्यास कोकणने सहभाग घेतला. कोकण आणि बाळासाहेब ठाकरे यांचे अनोखे नाते होते. बाळासाहेब ठाकरे यांचे कोकणावर नितांत प्रेम होते. त्यामुळे आत्ताच्या निवडणुकीत पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनाच येथील जनता पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून आणतील. जे कोण बाळासाहेबांचीच खरी शिवसेना असे सांगत होते, त्यांनी कोकणात आता निवडणूक का लढवली नाही ? निवडणुकीतून का पळ काढला ? त्यामुळे त्यांना खरे शिवसेना म्हणण्याचा अधिकार नाही. शिवाय जे कोण आमच्यावर आरोप करत आहेत, त्यांनीच कोकणातून शिवसेना हद्दपार केली. त्यामुळे त्यांना आमच्यावर बोलण्याचा अधिकार नाही."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com