चिपी विमानतळावर रंगले सुरक्षिततेबाबत ''मॉक ड्रिल''

चिपी विमानतळावर रंगले सुरक्षिततेबाबत ''मॉक ड्रिल''

swt259.jpg
79769
चिपीः येथील विमानतळावर ''मॉक ड्रिल'' राबविण्यात आले.

चिपी विमानतळावर रंगले
सुरक्षिततेबाबत ‘मॉक ड्रिल’
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. २५ः सुरक्षिततेबाबत जागरुकता आणि सतर्कता कशी बाळगावी, याबाबत ''मॉक ड्रिल'' चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर राबविण्यात आले.
एखाद्या वेळी आपत्कालीन परिस्थितीत विमानतळावर गंभीर परिस्थिती निर्माण झाली, तर त्याला कशा प्रकारे तोंड देता येईल, याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या आधारे मार्गदर्शन करण्यात आले. विमानतळाच्या सुरक्षिततेबाबत काय करायचे, याचेही प्रात्यक्षिक सिंधुदुर्ग विमानतळ व परिसरात करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ कुडाळ, अग्निशमन दल, प्राथमिक आरोग्य विभाग परुळेची रुग्णवाहिका, रुग्णसेविका तसेच सिंधुदुर्ग विमानतळ प्रशासक यांनी सहभाग घेतला. एखाद्या वेळी अपघात झाला किंवा आग लागण्याची घटना घडली, तर कशाप्रकारे सावधगिरी बाळगावी, याची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यावेळी विमानतळावर व्यवस्थापक किरण कुमार, कुलदीप सिंग, प्रीतेश शेट्टी, ‘ब्रेक्स इंडिया’चे हेमंत फडतरे, अनिल यादव यांच्यासह फ्लाय ९१ चे अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहभाग घेतला. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी वर्ग त्याचप्रमाणे निवती पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी वर्ग यावेळी सहभागी झाले होते. ही प्रात्यक्षिके पाहण्यासाठी परिसरातील नागरिकही उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com