मतदान प्रक्रियेसाठी
२९०१ ‘व्हीव्हीपॅट’

मतदान प्रक्रियेसाठी २९०१ ‘व्हीव्हीपॅट’

मतदान प्रक्रियेसाठी
२९०१ ‘व्हीव्हीपॅट’
सिंधुदुर्गनगरी, ता. २५ ः रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी प्राप्त मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) राहुल यादव यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. मतदान प्रक्रियेसाठी मतदारसंघात २७९३ बॅलेट युनिट, २७९३ कंट्रोल युनिट व २९०१ व्हीव्हीपॅट प्राप्त झाले. त्याची प्रथम सरमिसळ प्रक्रिया यापूर्वी झाली होती. मतदार केंद्रनिहाय देण्यात येणाऱ्या मतदान यंत्रांच्या क्रमांकांची ऑनलाईन पद्धतीने सरमिसळ प्रक्रिया करण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, सिंधुदुर्ग उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, ईव्हीएम व्यवस्थापन नोडल अधिकारी मारुती बोरकर यांच्यासह उमेदवारांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com