एमइएस कॉलेजमध्ये नॅशनल कॉन्फरन्स

एमइएस कॉलेजमध्ये नॅशनल कॉन्फरन्स

१४ (पान ४ साठी)

‘एमइएस’मध्ये आजपासून चर्चासत्र
चिपळूण, ता. २५ ः कौशल्यपूर्ण व्यावसायिक बनवण्यासाठी परिणामांवर आधारित शिक्षणप्रणालीचा वापर फार महत्वाचा आहे. या विषयाचे महत्व लक्षात घेऊन एमइएस कॉलेज ऑफ नर्सिंगने नॅशनल कॉन्फरन्सचे आयोजन लोटे परशुराम येथे केले आहे. उद्या (ता. २६) प्रारंभ होणार असून २७ ला समारोप करण्यात येणार आहे.
या कॉन्फरन्समध्ये मार्गदर्शनासाठी विविध विषयांवरील तज्ज्ञ आणि नर्सिंगमधील सुमारे २०० शिक्षक व विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. २६ ला चेअरमन बोर्ड ऑफ लाईफमेंबर डॉ. आनंद लेले, माजी प्रिन्सिपल डॉ. एम. एस. ज्योती, डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग पुणेच्या प्रोफेसर डॉ. साधना अध्यापक, गोखले एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट नर्सिंग नाशिकच्या प्रोफेसर कम प्रिन्सिपल डॉ. ज्योती ठाकूर, प्रिन्सिपल डॉ. शिल्पा शेट्टीगार हे मार्गदर्शन करणार आहेत. २७ ला कृष्ण इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्सच्या डिन डॉ. वैशाली मोहिते, डॉ. संगीता मोरेश्वर यांचे मार्गदर्शन आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com