घरपट्टी वसुलीत सिंधुदुर्गाची बाजी

घरपट्टी वसुलीत सिंधुदुर्गाची बाजी

घरपट्टी वसुलीत सिंधुदुर्गाची बाजी
जिल्हा परिषदेकडून वसुलीः आर्थिक वर्षात ९५ टक्के उदिष्ट पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २५ः सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने गेल्या आर्थिक वर्षात ग्रामीण भागातील घरपट्टी कर वसुलीमध्ये बाजी मारली आहे. एकूण ९५ टक्के वसुली केली असून केवळ पाच टक्के वसुली शिल्लक राहिली आहे. २६ कोटी ९ लाख ८७ हजार एवढ्या रुपयाची मागणी होती. २४ कोटी ७७ लाख ९१ हजार रुपये एवढी वसुली झाली आहे तर एक कोटी ३१ लाख ९६ हजार रुपये वसुली शिल्लक राहिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अंतर्गत ४३१ ग्रामपंचायती कार्यरत आहेत. या ग्रामपंचायतींची २०२२-२३ मधील ९६ लाख ४० हजार रुपये घरपट्टी वसुली शिल्लक होती तर २०२३-२४ या आर्थिक वर्षातील २५ कोटी १३ लाख ४७ हजार रुपये नव्याने घरपट्टी मागणी होती. अशा प्रकारे एकूण २६ कोटी ९ लाख ८७ हजार रुपयांची वसुली करण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेसमोर होते. यातील २०२२-२३ मधील थकीत ९६ लाख ४० हजार रुपयांची वसुली शंभर टक्के झाली आहे तर २०२३-२४ या वर्षा मधील २३ कोटी ८१ लाख ५१ हजार एवढी वसुली झाली आहे. एकूण २४ कोटी ७७ लाख ९१ हजार एवढी वसुली झाली आहे. यामध्ये सर्वाधिक वसुली मालवण आणि दोडामार्ग तालुक्यांनी ९९ टक्के एवढी केली आहे. सर्वात कमी वसुली वेंगुर्ले तालुक्यात ८९ टक्के एवढी झाली आहे. सर्वात जास्त ३४ लाख ७८ हजार रुपये वसुली देवगड तालुक्यात राहिली असून त्या पाठोपाठ वेंगुर्ला तालुक्यात ३१ लाख ५३ हजार आणि कणकवली तालुक्यात २९ लाख २ हजार रुपये एवढी वसुली शिल्लक राहिली आहे.

* पाणीपट्टी वसुली ९८ टक्के
जिल्ह्यातील एकूण नळ योजनांची २०२२-२३ मधील २९ लाख एक हजार रुपये एवढी वसुली थकीत होती तर नव्याने २०२३-२४ मध्ये ९ कोटी ७३ लाख ९५ हजार एवढी मागणी होती. २०२३-२४ मध्ये एकूण दहा कोटी दोन लाख ९६ हजार एवढी मागणी होती. यातील २०२२-२३ मधील शंभर टक्के वसुली झाली असून २०२३-२४ मधील ९ कोटी ५७ लाख तीस हजार रुपये एवढी वसुली झाली आहे. एकूण मागणीच्या नऊ कोटी ८६ लाख ३१ हजार रुपये एवढी वसुली झाली आहे तर २४ लाख ७६ हजार रुपये वसुली शिल्लक राहिली आहे. उद्दिष्टाच्या एकूण ९८ टक्के वसुली झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ११४ टक्के काम वेंगुर्ले तालुक्यात झाले असून दोडामार्ग, सावंतवाडी, मालवण आणि कुडाळ या चार तालुक्यांची वसुली शंभर टक्के झाली आहे. सर्वात कमी वसुली वैभववाडी तालुक्यात ९४ टक्के एवढी आली आहे.

* १० टक्केचा ११२ टक्के खर्च
शासनाने निर्णयानुसार ग्रामपंचायतींना आपल्या वार्षिक बजेटच्या १० टक्के निधी हा महिला व बालकल्याण विकासासाठी राखीव ठेवावा लागतो. त्यानुसार जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतीनी १९ लाख ३४ हजार रुपये एवढा निधी राखीव ठेवला होता. मात्र, ग्रामपंचायतीनी उद्दिष्टांच्या पुढे जावून यासाठी ११२ टक्के निधी खर्च केला आहे. एकूण २१ लाख ६८ हजार रुपये निधी खर्च केला आहे.

* १५ टक्केचा ९६ टक्के खर्च
शासनाच्या निर्णयानुसार ग्रामपंचायतींना आपल्या वार्षिक बजेटमधील १५ टक्के निधी मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी ठेवावा लागतो. त्यानुसार २०२३-२४ या आर्थिक वर्षात ३ कोटी ९९ लाख ५० हजार रुपये निधी राखीव ठेवण्यात आला होता. २०२२-२३ या मागील आर्थिक वर्षातील १९ लाख ६९ हजार रुपये निधी शिल्लक होता. त्यामुळे २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण ४ कोटी १९ लाख १९ हजार रुपये एवढा निधी खर्च करण्याचे उद्दिष्ट होते. यातील २०२२-२३ चे थकीत १९ लाख ६९ हजार रुपये १०० टक्के खर्च झाले आहेत. तर २०२३-२४ मधील ३ कोटी ८२ लाख ५८ हजार रुपये निधी खर्च झाला आहे. एकूण ४ कोटी २ लाख २७ हजार रुपये खर्च झाले असून १७ लाख ९ हजार रुपये निधी शिल्लक राहिला आहे. उद्दिष्टांच्या ९६ टक्के खर्च झाला आहे. कुडाळ, कणकवली, मालवण आणि वैभववाडी, दोडामार्ग या तालुक्यांनी १०० टक्के खर्च केला आहे.

* दिव्यांग निधी १०० टक्के खर्च
सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला व बालकल्याण आणि मागासवर्गीय निधीप्रमाणे आपआपल्या क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींच्या विकासासाठी एकूण बजेटच्या ५ टक्के निधी ग्रामपंचायतींना राखीव ठेवावा लागतो. जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतीनी २०२३-२४ मध्ये एकूण एक कोटी ३५ लाख ८३ हजार रुपये निधी राखीव ठेवला होता. २०२२-२३ मधील १७ हजार रुपये थकीत होते. त्यामुळे २०२३-२४ मध्ये एकूण एक कोटी ३६ लाख रुपये खर्चाचे उद्दिष्ट होते. मात्र, उद्दिष्टांच्या बाहेर जावून १ कोटी ३६ लाख ३४ हजार रुपये एवढा खर्च करण्यात आला आहे.
------------------
कोट
जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतीनी घरपट्टी, पाणीपट्टी वसुली यामध्ये चांगले काम केले आहे. याशिवाय राखीव असलेल्या दिव्यांग निधी, मागासवर्गीय निधी आणि महिला व बालकल्याण निधी सुद्धा खर्च केला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत विभाग २०२३-२४ या आर्थिक वर्षात यशस्वी ठरला आहे.
- विशाल तनपुरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद
-------------------
चौकट
२०२३-२४ मधील घरपट्टी वसुली तक्ता (लाखात)
तालुका*मागणी*खर्च*टक्के
कुडाळ*४७९.९१*४७०.२५*९८
कणकवली*५१९.४०*४९०.३८*९४
मालवण*३१९.११*३१५.४९*९९
देवगड*३५९.३३*३२४.५५*९०
वैभववाडी*१३२.००*११८.९०*९०
सावंतवाडी*४१०.२२*४००.९४*९८
वेंगुर्ले*२८३.४०*२५१.८७*८९
दोडामार्ग*१०६.५०*१०५.५३*९९
------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com