सेल्फी पॉइंटमधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

सेल्फी पॉइंटमधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

३६ (पान ५ साठी, अँकर)

- ratchl२५३.jpg-
२४M७९८१६
चिपळूण ः पालिकेने तयार केलेला सेल्फी पॉइंट.

सेल्फी पॉइंटमधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

चिपळूण पालिकेचा उपक्रम; पर्यावरणप्रेमींकडून कौतुक

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २५ ः नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या वातावरणात मोबाईलवर सेल्फी काढण्याची मज्जा काही औरच असते. तरुणाईमध्ये तर सेल्फीची क्रेझच आहे. असाच एक ‘सेल्फी पॉइंट` सध्या चिपळूण शहरात चर्चेचा विषय बनला आहे. चिपळूण नगरपालिकेने साकारलेला हा ‘सेल्फी पॉइंट` पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
जागतिक वसुंधरा दिन नुकताच साजरा झाला. या दिवसाचे औचित्य साधून चिपळूण पालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने माझी वसुंधरा अभियान ४.० आणि स्वच्छ सर्वेक्षण २०२४ अंतर्गत शहरातील शिवनदी काठावर वृक्षसंगोपन उपक्रम राबवला. विद्यार्थ्यांसह सामाजिक संस्था, मंडळे, पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमी यांच्यासह अधिकारी, कर्मचारीवर्गाने या कार्यक्रमात सहभाग घेत वृक्ष संगोपनाची शपथ घेतली तर टाकाऊ वस्तूंपासून नागरिकांच्या नजरेला भुरळ पडेल, असा ‘सेल्फी पॉइंट` तयार केला. जुने टायर्स, टोपल्या, पिंप यांना रंगरंगोटी करून त्यावर माझी वसुंधरा अभियान चिपळूण, पालिका चिपळूण, जल, अग्नी, पृथ्वी, वायू, आकाश अशी नावे देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. हा सेल्फी पॉइंट चिपळूण पालिकेसमोर उभारण्यात आला आहे. हा पॉइंट नागरिकांसह निसर्गप्रेमींसाठी आकर्षण बनलेला आहे. अनेकजण येथे येऊन आपल्या मोबाईलवर सेल्फी घेताना दिसतात. या उपक्रमाचे पर्यावरणप्रेमींकडून कौतुक होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com