बांदा जि. परिषद मतदारसंघात महायुतीतर्फे प्रचाराचा शुभारंभ

बांदा जि. परिषद मतदारसंघात महायुतीतर्फे प्रचाराचा शुभारंभ

swt2518.jpg
79857
बांदा : येथे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराच्या प्रारंभप्रसंगी उपस्थित असलेले भाजप, शिवसेना, मनसे या घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते. (छायाचित्र - नीलेश मोरजकर)

बांदा जिल्हा परिषद मतदारसंघात
महायुतीतर्फे प्रचारास प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २५ : लोकसभेचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बांदा जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रचाराचा प्रारंभ आज श्री देव बांदेश्वर व श्री देवी भूमिका चरणी श्रीफळ ठेवून करण्यात आला. यावेळी महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्यावतीने राणे यांच्या विजयासाठी साकडे घातले.
यावेळी भाजपचे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब, माजी सभापती प्रमोद कामत, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, बांदा मंडल महिला मोर्चा अध्यक्षा सौ. रूपाली शिरसाट, बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच बाळू सावंत, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मंदार कल्याणकर, माजी उपसभापती शीतल राऊळ, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मकरंद तोरसकर, आबा धारगळकर, प्रशांत बांदेकर, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, सिद्धेश महाजन, सुधीर शिरसाट, नीलेश देसाई, साई धारगळकर, संदीप बांदेकर, अनिकेत धोंगडे, गजानन गायतोंडे, वाफोली उपसरपंच विनेश गवस, प्रवीण देसाई, सागर सावंत, शैलेश केसरकर, मनसेचे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, बांदा शहर अध्यक्ष चिन्मय नाडकर्णी, आत्माराम बांदेकर, शिवसेनेचे भैय्या गोवेकर, भाऊ वाळके, गिरीश नाटेकर, माजी सरपंच बाळा आकेरकर, नीलेश कदम, माजी सरपंच दीपक सावंत, मनोज कल्याणकर, अक्षय मयेकर, लक्ष्मी सावंत, रेश्मा सावंत, श्रेया केसरकर, दीपलक्ष्मी सावंत, शामराव सावंत उपस्थित होते. यावेळी बांदा शहरात घरोघरी प्रचार करून पत्रके वाटण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com