सावंतवाडी-सालईवाडा परिसरातील तरुणाचा मोती तलावात मृतदेह

सावंतवाडी-सालईवाडा परिसरातील तरुणाचा मोती तलावात मृतदेह

सालईवाड्यातील तरुणाचा
मोती तलावात मृतदेह
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ः येथील मोती तलावात सालईवाडा परिसरात राहणाऱ्या तरुणाचा मृतदेह आढळून आला. महेंद्र मधुकर मोरजकर (वय ४०) असे त्याचे नाव आहे. हा प्रकार आज सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आला.
याबाबत अधिक माहिती अशी कीः येथील मोती तलावात न्यायालयाच्या बाजूने आज सायंकाळी पाचच्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह तेथून जाणाऱ्या काहींना तरंगत असल्याचा दिसून आला. त्यांनी याबाबतची माहिती येथील पोलीसात दिली. त्यानुसार पोलीस अनिल धुरी, महेश जाधव, श्री. कोरगावकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्याने परिधान केलेल्या टी-शर्टवर डी- सालईवाडा असे लिहिलेले दिसून येत होते.
याबाबतची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. त्यातील काही जणांना त्याची ओळख पटवली. त्याचे नाव महेंद्र मोरजकर असल्याचे समजले. त्यानंतर त्याच्या भावाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्याने तो आपला भाऊ महेंद्र असल्याचे सांगितले. तो आज सकाळच्या सुमारास तलावात पडला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला. तलावात पडला की त्याने आत्महत्या केली याबाबत माहिती मिळाली नाही. याबाबतचा तपास सावंतवाडी पोलीस करीत आहेत. मृतदेह विच्छेदनासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे. मृत महेंद्र हा सालईवाडा परिसरात इस्त्री व्यवसाय करत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com