पान एक-कणकवलीत पुन्हा चोरी

पान एक-कणकवलीत पुन्हा चोरी

टीपः swt2523.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ - कणकवली ः शहरातील परबवाडी येथील सावंत कुटुंबियांच्या घरातील बेडमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने लंपास झाले.

कणकवलीत पुन्हा चोरी
दागिने लंपास ः १४ तोळ्यांचा ऐवज, सलग चौथी घटना
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २५ ः शहरात आज पुन्हा चोरीची घटना उघड झाली. यात घराच्या बेड कप्प्यामध्ये ठेवण्यात आलेले १४ तोळ्याचे दागिने लंपास झाले आहेत; मात्र याप्रकरणी अद्याप पोलिसांत तक्रार दाखल झालेली नाही. तालुक्‍यात चार दिवसांतील चोरीची ही चौथी घटना आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की ः शहरातील परबवाडी येथील सावंत कुटुंबियांनी आपल्या घरातील बेडरूमच्या कप्प्यात चादर व इतर साहित्‍यासह १४ तोळे दागिने असलेली पिशवी ठेवण्यात आली होती. काल (ता.२४) सावंत यांनी नव्याने खरेदी केलेला सोन्याचा दागिना बेडमधील कप्प्यात ठेवण्यासाठी बेडचा कप्पा उघडला असता, त्‍यात सोन्याचा ऐवज असलेली पिशवी आढळून आली नाही. त्‍यामुळे तेथे ठेवलेले सर्व दागिने लंपास झाल्‍याची बाब लक्षात आली. १८ ते २४ एप्रिल या दरम्‍यान ही चोरी झाल्‍याची शक्‍यता सावंत कुटुंबियांनी व्यक्‍त केली आहे. चोरीस गेलेल्‍या १४ तोळे सोन्याच्या ऐवजामध्ये ८ तोळ्याचे मंगळसूत्र, ४ तोळ्याचा हार, १३ ग्रॅमची चैन, अडीच ग्रॅमची अंगठी, ४ ग्रॅमचे कानामधील कुंडी आणि एक नथ या दागिन्यांचा समावेश आहे. ही घटना लक्षात येताच सावंत यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली होती; मात्र याबाबतची तक्रार त्‍यांनी दिलेली नाही.
तालुक्‍यात यापूर्वी २१ एप्रिलला शेर्पे-मुस्लीमवाडी येथे बंद घर फोडून चोरी झाली होती; मात्र या चोरीतील दोन्ही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. त्‍यानंतर २२ ला शहरातील विद्यानगर येथील डॉ. विकास एन. एम. यांचा बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी ३० हजाराची सोन्याची चैन आणि १५ हजाराची रोकड लंपास केली. तर २३ ला रात्री कलमठ-तरंदळे रोड येथील रूपेश जाधव यांच्या घरात प्रवेश करून चोरट्यांनी नवी दुचाकी लंपास केली आहे. त्‍यानंतर आज परबवाडी येथील १४ तोळे सोने चोरीची घटना उघडकीस आली आहे.
--------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com