महाळुंगे खुनप्रकरणी संशयितास कोठडी

महाळुंगे खुनप्रकरणी संशयितास कोठडी

महाळुंगे खुनप्रकरणी
संशयितास कोठडी
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २५ ः तालुक्यातील महाळुंगे-धनगरवाडी परिसरात घडलेल्या खून प्रकरणातील संशयितास विजयदुर्ग पोलिसांनी अटक करून येथील न्यायालयासमोर हजर केले. सुनील सदानंद पेडणेकर (वय ५८) असे संशयिताचे नाव आहे. न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत (ता. २७) पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती विजयदुर्ग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक एम. पी. सोनवलकर यांनी दिली.
चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीचा खून केल्याची घटना शुक्रवारी (ता.१९) घडली होती. सुप्रिया सुनील पेडणेकर (वय ५०) हिच्या खुनप्रकरणी पती सुनील पेडणेकर (वय ५८) याला संशयित म्हणून विजयदुर्ग पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यानच्या काळात त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याने पुढील कार्यवाही लांबणीवर पडली होती. उपचाराअंती अखेर विजयदुर्ग पोलिसांनी त्याला अटक करून आज येथील न्यायासमोर हजर केले. न्यायालयाने संशयिताला शनिवारपर्यंत (ता. २७) पोलिस कोठडी सुनावली. अधिक तपास विजयदुर्ग पोलिस करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com