
२७ (पान ५ साठी, सेकंड मेन)
- rat२८p११.jpg, rat२८p१२.jpg-
P२४M८०३२२, P२४M८०३२३
रत्नागिरी ः सागरी मार्गावरील भाट्ये ते गोळप या सागरी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येतो.
रत्नागिरी -पावस रस्त्याच्या दुतर्फा कचरा
पर्यटक नाकं मुरडतात ; स्वच्छतेची ऐशी तैशी
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. २८ ः सर्वत्र स्वच्छ भारत सुंदर भारत अभियान राबवत स्वच्छतेचा नारा दिला जात आहे. मात्र रत्नागिरी ते पावस या सागरी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा कचरा टाकला जात असल्याने स्वच्छतेची ऐशी तैशी होत असल्याचे चित्र या परिसरात दिसत आहे.
रत्नागिरी ते पावस या सागरी मार्गावरती रस्त्याच्या दुतर्फा प्रत्येक गावातील नागरिक आपल्या घरातील प्लास्टिक कचरा रस्त्याच्या बाजूला टाकून मोकळे होतात त्याची विल्हेवाट न लावता तशा स्थितीमध्ये रस्त्याच्या बाजूला कचरा टाकला जातो. या भागात फिरणाऱ्या मोकाट जनावरांना अन्य कोणती खाद्य असल्याने या प्लास्टिकचा भाव वाढलेला दिसत आहे त्यामुळे अनेक जनावरे प्लास्टिक खाण्यामध्ये धन्यता मानत आहे मात्र सर्वसामान्य नागरिक व ग्रामपंचायत स्तरावर याबाबतीत कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही त्यामुळे दिवसेंदिवस रस्त्यावरती कचऱ्याचे ढीग दिसत आहे या मार्गावरून पर जिल्ह्यातील अनेक लोक व पर्यटक या मार्गावरून ये जा करत असतात रस्त्याच्या दोन्ही बाजूला कचऱ्याचे ढीग दिसत असल्यामुळे या मार्गावरील परिसराची स्वच्छतेची ऐशी तैशी झाल्याचे चित्र दिसत आहे. याबाबत कचरा टाकणाऱ्या लोकांना व ग्रामपंचायत स्तरावर कोणतेही पाऊल उचलले जात नाही त्यामुळे परिसर अस्वच्छ दिसत आहे याबाबत कचऱ्याची विल्हेवाट तातडीने लावण्यात यावी व कचरा टाकणाऱ्या वरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.