तुम्हाला मुस्लीम मतांची गरज काय0

तुम्हाला मुस्लीम मतांची गरज काय0

swt295.jpg
80503
सतिश सावंत

तुम्हाला मुस्लीम मतांची गरज काय ?
सतिश सावंतः आमदार राणे यांच्यावर आरोप
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २५ः तुम्ही कट्टर हिंदुत्ववादी असाल तर तुम्हाला आता मुस्लीम मतांची गरज काय ? असा प्रश्न उपस्थित करीत ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्याना आमदार नितेश राणेंकडून वेगवेगळी आमिषे दाखवत जात असल्याचा आरोप शिवसेना (ठाकरे गट) नेते सतिश सावंत यांनी आज येथे केला.
येथील ठाकरे शिवसेना संपंर्क कार्यालयात श्री. सावंत यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांच्यासोबत उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके, स्वप्निल धुरी, संदीप सरवणकर, सुरेश पांचाळ, पंढरी तावडे, जितेंद्र तळेकर, विलास नावळे, दिव्या पाचकुडे, रोहीत पावसकर, जावेद पाटणकर, गुलझार काझी आदी उपस्थित होते.
श्री. सावंत म्हणाले, ‘‘स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलिन केल्यानंतर आमदार नितेश राणे हे स्वतः कट्टर हिंदुत्ववादी बनल्याचा आव आणत होते. ते कट्टर हिंदुत्ववादी असतील तर त्यांना आता मुस्लीम मतांची गरज काय ? श्री. राणे आतापर्यत शिवसेना शिल्लक नाही, असे वारंवार सांगत होते. परंतु, आता ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा ते वेगवेगळ्या माध्यमातून प्रवेश घेत आहेत. याचा अर्थ जिल्ह्यात शिवसेनेचे अस्तित्व आहे हे त्यांनी मान्य केले आहे. दहा वर्षात जर विकास कामे केली असती तर त्यांना आता कार्यकर्त्याना वेगवेगळी आमिषे दाखविण्याची गरज भासली नसती.’’
ते म्हणाले, ‘‘स्वाभिमान संघटनेचे काही पदाधिकारी जिल्ह्यात आले असून येथील ठाकरे शिवसेनेच्या मुस्लीम कार्यकर्त्याच्या घरी जाऊन त्यांना धमकावीत आहेत. निवडणुक आयोग, पोलीस खात्याने यांची नोंद घ्यावी. आमदार राणे यांनी या निवडणुकीत कितीही आमिषे दाखवली तरी या निवडणुकीत त्यांनी आपल्या वडिलांचा तिसरा पराभव पचविण्याची मानसिकता ठेवावी.’’

चौकट
राणेंना विकासाशी देणघेण नाही
आमदार राणेंना विकासात कसलेही देणघेण नाही. त्यांनी येथे ठेकेदारांची संघटना बांधली आहे. त्यामुळेच त्यांना आता निवडणुकीत आमच्या कार्यकर्त्याची गरज भासत असल्याची टिका त्यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com