बांदावासीयांची राणेंना साथ

बांदावासीयांची राणेंना साथ

80505
बांदा ः शहरात प्रभाग क्रमांक दोनमध्ये मतदारांना प्रचार पत्रके देताना जावेद खतीब. शेजारी इतर. (छायाचित्र - नीलेश मोरजकर)

बांदावासीयांची राणेंना साथ

जावेद खतीब ः प्रभाग क्रमांक दोनमध्ये प्रचार मोहीम

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २९ ः भाजप महायुतीचे लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांना बांदा शहरातून सर्वाधिक मताधिक्य देणार असल्याचा निर्धार बांद्याचे माजी उपसरपंच तथा भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस जावेद खतीब यांनी केला आहे. शहरातील प्रभाग क्रमांक दोनमध्ये त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह घरोघरी प्रचारावर भर दिला आहे.
श्री. खतीब म्हणाले की, शहरात भाजपचे निर्विवाद वर्चस्व असून शहरातून मंत्री राणे यांना ९० टक्के मतदान देण्यात येणार आहे. यासाठी नियोजनपूर्वक प्रचार यंत्रणा राबविण्यात येत असून शहरात घरोघरी प्रचारावर भर देण्यात आला आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी बांदा शहरातून नारायण राणे यांना सर्वाधिक मताधिक्य देण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना जनतेपर्यंत पोहचविण्यात येत असून याचा फायदा निश्चितच महायुतीचे उमेदवार राणे यांना मिळणार आहे. प्रभाग क्रमांक दोन मध्ये यावेळी भाजपचे ग्रामपंचायत सदस्य श्रेया केसरकर, पदाधिकारी शैलेश केसरकर, राकेश केसरकर, सिद्धेश महाजन, मनोज कल्याणकर, प्रवीण नाटेकर, सुनील धामापूरकर, सागर तेली, अनिकेत धोंगडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com