कोलगाव भवानी देवीचा आजपासून गोंधळोत्सव

कोलगाव भवानी देवीचा आजपासून गोंधळोत्सव

swt298.jpg
80507
श्री देवी भवानी

कोलगाव भवानी देवीचा
आजपासून गोंधळोत्सव
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २९ः कोलगाव येथील सावंत परिवारांचा श्री देवी भवानी मातेचा द्विवार्षिक जागरण गोंधळ उत्सव उद्या (ता. ३०) व बुधवारी (ता. १) साजरा होत आहे. त्यानिमित्त दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. उद्या (ता. ३०) सकाळी ७ वाजता सर्व संचारांना हाक मारणे व देवीचा पाटा बाहेर घेणे, सायंकाळी ७ वाजता देवीचा मांड भरणे, दिवटीवर तेल घालणे व नवस फेडणे हे कार्यक्रम होतील. रात्री ९ वाजता गोंधळी कलाकारांचा पारंपरिक गोंधळाचा कार्यक्रम आणि रात्री १०.३० वाजता आजगावकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग सादर होईल. बुधवारी (ता. १) सर्व संचारांना हाक मारून देवीचा पाटा आत घेणे, देवीची ओटी भरणे हे कार्यक्रम होतील. त्यानंतर श्रींची महापूजा, दुपारी आरती, तीर्थप्रसाद आदी कार्यक्रम होतील. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सावंत परिवारातर्फे करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com