काही आठवणी

काही आठवणी

लोगो - काही आठवणी
--
२४M८०४७६
संजय गाडगीळ


तात्या दिल्लीला गेले की, गल्लीत भेटणार नाही

लीड
गुहागरचे माजी आमदार तात्या नातू म्हणजे नागरिकांना सहज उपलब्ध होणारा नेता. ते दिल्लीला गेले तर आम्हाला गल्लीत भेटणार नाही, असा काहींचा समज होता. त्यामुळे ते दोनवेळा लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आणि दोन्हीवेळा गुहागरमधून त्यांना कमी मताधिक्य मिळाले. तात्या विधानसभेत पाहिजे; पण दिल्लीला जायला नको, असे काहीजण गमतीने त्या काळी सांगायचे.
- संजय गाडगीळ, वेळंब
........
१९८४ ला राजापूर लोकसभा मतदार संघातून जनता पक्षाचे प्रा. मधु दंडवते हे अवघ्या २७ हजार मताधिक्य घेऊन विजयी झाले होते. तेव्हा महाराष्ट्राचे तत्कालीन ग्रामीण विकास व आरोग्यमंत्री भाईसाहेब सावंत निवडणूक लढवत होते. कोकणच्या काँग्रेसच्या राजकारणात स्व. भाईसाहेब सावंत आणि अॅड. एस. एन. देसाई यांच्यातला सुप्त संघर्ष सर्वश्रुत होता. त्या वेळी कुडाळच्या अरविंद बाक्रे यांना अपक्ष म्हणून उभं करण्यात अॅड. एस. एन. देसाई यांचा अदृश्य हात होता, अशी तेव्हा चर्चा व्हायची. रत्नागिरी लोकसभा मतदार संघातून काँग्रेसकडून हुसेन दलवाई १ लाख ६७ हजार मत घेऊन विजयी झाले तर त्यांच्या विरोधात भाजपचे गुहागरचे आमदार स्व. श्रीधर दत्तात्रय उर्फ तात्या नातू हे १ लाख ४४ हजार १४ मत घेऊन २३ हजार मतांनी पराभूत झाले. १९८९ ला राजापूर लोकसभा निवडणुकीत जनता पक्षाचे उमेदवार प्रा. मधु दंडवते २ लाख ४१ हजार ६९४ मत घेऊन विजयी झाले होते तर काँग्रेसचे शिवरामराजे भोसले हे १ लाख ९९ हजार ३२४ मत घेऊन पराभूत झाले होते. तब्बल १८ वर्षानंतर झालेल्या लढतीतही शिवरामराजे भोसले यांना पराभव पत्करावा लागला होता. या वेळी रत्नागिरी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे गोविंदराव निकम २ लाख ४० हजार ७५९ मत घेऊन यामध्ये १९ हजार ५०० मताधिक्याने विजयी झाले होते. या वेळी भाजपाचे डॉ. श्रीधर उर्फ तात्या नातू हे २ लाख २२ हजार २७१ इतके मत घेऊन पराभूत झाले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर विधानसभा मतदार संघाचे सलग आमदार असलेले डॉ. तात्यासाहेब नातू लोकसभा निवडणुकीत मात्र पराभूत व्हायचे. ते देखील त्यांच्याच गुहागर विधानसभा मतदार संघातून तात्यासाहेब नातू यांना मताधिक्य मिळत नव्हते. दोन्हीवेळचा भाजपाच्या तात्यासाहेब नातूंचा पराभव हा २० हजारच्या मतांनी व्हायचा. यातलं तेव्हा नेमकं सत्य कारण काय, याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला तेव्हा गुहागरच्या जनतेला तात्यासाहेब नातू हे आमदार म्हणून हवे होते; परंतु खासदार म्हणून ते नको होते. याचे मूळ कारण तात्यासाहेब दिल्लीत गेले की, आपणाला भेटणार नाहीत असा गैरसमज जनतेचा होत असावा, अशी चर्चा तेव्हा व्हायची. यातलं आणखी एक सत्य म्हणजे भाजपाचे तात्यासाहेब नातू यांचा गुहागरच्या जनतेशी असलेला ‘स्नेह’ त्यांच्याशी असलेले भावनिक, कौटुंबिक नातं अधिक महत्वाच होतं. त्या भागातील घराघरामध्ये तात्यांना मानणारा, स्नेह जपणारी सामान्य जनता होती. माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्यावरही जनतेने भरभरून प्रेम केलं. तात्यांच्या निधनानंतर डॉ. विनय नातू यांना दोनवेळा आमदार केलं; परंतु शिवसेना-भाजपाच्या जागावाटपात माजी मंत्री रामदास कदम यांच्या हट्टामुळे भाजपाला ती विधानसभा जागा सोडावी लागली होती. ऐंशीच्या दशकातही एकीकडे कधी काँग्रेस बहुतांशवेळा समाजवादी विचारांचा पगडा असतानाही जनसंघाच्या बाजूनेही मोठ्या प्रमाणावर मतदान होत होतं. यामुळे कोकणातही आरएसएसची विचारधारा ४० वर्षापूर्वीही कोकणात रूजलेली होती, असा निष्कर्ष काढता येतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com