खारेपाटण शहरात पोलिसांचे संचलन

खारेपाटण शहरात पोलिसांचे संचलन

swt299.jpg
80512
खारेपाटणः येथील बाजारपेठेत पोलिसांनी संचलन केले. (छायाचित्रः एन. पावसकर)

खारेपाटण शहरात
पोलिसांचे संचलन
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २९ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खारेपाटण येथे आज सकाळी ११.३० वाजता कायदा व्यवस्था सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने पोलिसांच्या पथकाने संचलन केले. कणकवली पोलिस निरीक्षक शरद देठे यांच्या नेतृत्वाखाली हे संचलन करण्यात आले. यामध्ये खारेपाटण पोलिस दूरक्षेत्राचे प्रमुख पोलिस नाईक उद्धव साबळे, कॉन्स्टेबल पराग मोहिते व अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
कणकवली पोलिस ठाणे अंमलदार ग्रुप व राज्य राखीव पोलिस दलाची गोंदिया-पुणे येथील शीघ्र दलाची तुकडी असे मिळून एकूण ९० पोलिस कर्मचारी सुरक्षा शस्त्रे व पाच वाहनांसह उपस्थित होते. खारेपाटण बसस्थानक येथे संचलन झाल्यनंतर बाजारपेठ मार्गे घोडेपाथर बंदर, खारेपाटण अशी प्रभात फेरी काढण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com