अभिनय संस्कार शिबिर

अभिनय संस्कार शिबिर

बातमी क्र. २३ (पान ५ साठी)
-----------

- rat२५p७.jpg -

KOP२४M७९७११
पोफळी येथे आयोजित अभिनय व नाट्यसंस्कार शिबिरात सहभागी झालेल्या शिबिरार्थींना प्रमाणपत्र देण्यात आले.

अभिनय शिबिरात विद्यार्थ्यांचा सहभाग

चिपळूण, ता. २९ ः थिएटर अॅकॅडमी आयोजित सातदिवसीय अभिनय व नाट्यसंस्कार कार्यशाळा उत्साहात झाली. कार्यशाळेतील शिबिरार्थींचे दोन विनोदी आणि सामाजिक विषयांवर भाष्य करणारे बालनाट्य करमणूक केंद्र पोफळी येथे सादर करण्यात आले. या शिबिरात २० मुलांनी सहभाग घेतला. मुलांना नाटक म्हणजे काय? अभिनय म्हणजे काय? या गोष्टी दिलीप आंब्रे यांनी शिकवल्या. व्यक्तीरेखांचा अभ्यास कसा करायचा, त्या साकारताना कोणती काळजी घ्यायची याचे मार्गदर्शन संकेत हळदे यांनी केले. रंगमंचावरील वावर, प्रकाशयोजना, संगीत संयोजन, सेट आणि प्रॉपर्टी यावर उदय पोटे यांनी मुलांना सखोल मार्गदर्शन केले. अभिनयाचे विविध अंग आणि नवरस यावर मालिका दिग्दर्शक आकाश मोहिते यांनी मार्गदर्शन केले. वेशभूषा-रंगभूषा यावर अभिनेते, दिग्दर्शक मंगेश डोंगरे यांनी मार्गदर्शन केले. शिबिरात पालकांसाठी मानसोपचार तज्ञ डॉ. श्रुतिका कोतकुंडे यांचे पालकत्व या विषयावर व्याख्यान ठेवण्यात आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com