हापूस रत्नागिरीतून थेट लेबनानला

हापूस रत्नागिरीतून थेट लेबनानला

rat29p15.jpg
80497
रत्नागिरीः निर्यातीसाठीचा दर्जेदार हापूस.
rat29p16.jpg-
80498
रत्नागिरी ः सलील दामले यांच्या केंद्रावरून निर्यातीसाठी पॅकिंग केलेला हापूस.

हापूस रत्नागिरीतून थेट लेबनानला
बागायदार सलील दामले यांच्याकडून कॅनडा, इंग्लंड, अमेरिका, चायना, जपान अशा सहा देशात सात टन निर्यात
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ः कोकणातील हापूसला सातासमुद्रापार प्रचंड मागणी आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रत्नागिरीतून थेट हापूसची निर्यांत केली जात आहे. यंदा कोकणातील हापूसची चव प्रथमच लेबनानवासियांनी चाखली आहे. रत्नागिरीतील आंबा बागायतदार सलील दामले यांनी एक टन आंबा लेबनानला निर्यात केला आहे. आतापर्यंत कॅनडा, इंग्लंड, अमेरिका, चायनासह जपानला सहा टन आंबा थेट निर्यात केला आहे.
दर्जेदार हापूसचे उत्पादन घेण्यासाठी सलील दामले यांचे नाव घेतले जाते. यंदा हापूसचे उत्पादन चांगले आले आहे. त्यामुळे वाशीसारख्या बाजारात दलालांकडील दर कमी झाले आहेत; परंतु अनेक आंबा बागायतदार थेट ग्राहकाकडे विक्री करण्यावर भर देत आहेत. स्थानिक मार्केटबरोबरच निर्यातीवरही काही बागायतदारांचा कल असतो. त्याप्रमाणे रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे येथील आंबा बागायतदार सलील दामले यांचे नाव घेतले जाते. निर्यातीसाठी आवश्यक परवानग्या घेत ते गेली काही वर्षे विविध देशांमध्ये आंबा पाठवत आहेत. यंदा एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यातच निर्यातीला सुरवात केली आहे. आतापर्यंत लेबनान या देशात रत्नागिरीतील बागायतदारांकडून थेट हापूस पाठवण्यात आलेला नव्हता. दामले यांच्यामार्फत एक टन आंबा नुकताच निर्यात केला गेला आहे. तिथे उष्णजल प्रक्रिया करून आंबे पाठवले जातात. चेन्नई येथील प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया करून हापूस विमानाने लेबनानला गेला. जिल्ह्यातून प्रथमच आंबा गेल्याचे दामले यांनी सांगितले. आतापर्यंत चायना, अमेरिका, इंग्लंड, कॅनडा या देशात सुमारे सहा टन आंबा पाठवण्यात आला असून, लवकरच जपानला एक टन आंबा रवाना होणार आहे.
निर्यातीसाठी गॅप सर्टिफिकेट अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर कृषी विभागाचा अ‍ॅनलायटिक रिपोर्ट महत्वाचा असतो. हा अहवाल निर्यातीसाठी गरजेचा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील तीन बागायतदारांनी कृषी विभागाकडून याचा परवाना घेतला आहे. त्यासाठी बागांमध्ये वापरण्यात येणारी औषधे, खते यांची सविस्तर माहिती द्यावी लागते. बागांचे व्यवस्थापन कसे केले जाते, याची नोंदही ठेवली जाते. त्यानंतरच कृषी विभागाकडून अहवाल देण्यात येतो.

चौकट
हवाई वाहतुकीचे दर ३० टक्कांनी वाढले
इस्राईल-पॅलस्टाईन युद्धामुळे समुद्रमार्गे होणाऱ्या वाहतुकीत अडथळे आले आहेत. त्यामुळे मालवाहतुकीचा भार हवाई वाहतुकीवर आला आहे. परिणामी, हवाई वाहतुकीसाठीच्या दरात ३० टक्के वाढ झाली आहे. त्याचा फटका आंबा निर्यातदारांना बसत आहे. अमेरिकेत आंबा पाठवण्यासाठी किलोला ५०० रुपये खर्च येत होता. तोच आता ५७० ते ६४० रुपये प्रति किलो येत आहे. त्याचा परिणाम रत्नागिरीतून थेट आंबा निर्यात करणाऱ्या उत्पादकांना बसत आहे. त्यावरही मात करत सलील दामले यांच्या बागेतील हापूस सहा देशांमध्ये गेला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com