खेड - भरणेनाक्यात वाहतुकीला लागणार शिस्त

खेड - भरणेनाक्यात वाहतुकीला लागणार शिस्त

rat29p23.jpg-
80532
खेडः येथील भरणेनाक्याचा परिसर.

भरणेनाक्यात वाहतुकीला लागणार शिस्त
महामार्गावर पोलिसचौकी उभारणार; राष्ट्रीय महामार्ग विभागाशी चर्चा
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २९ : भरणे येथील मध्यवर्ती ठिकाणी वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांनी यापूर्वीच हटवून परिसर वाहतुकीसह रहदारीसाठी मोकळा केला आहे. या पाठोपाठच सतत वर्दळ असलेल्या भरणे येथील मध्यवर्ती ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी लवकरच पोलिस चौकी उभारण्यात येणार आहे. याबाबत भोयर यांनी राष्ट्रीय महामार्गखात्याच्या अधिकाऱ्यांशी रितसर चर्चाही केली.
भरणे येथील मध्यवर्ती ठिकाण अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले होते. उड्डाणपुलाखालील दोन्ही बाजूच्या रस्त्यालगत थाटलेल्या दुकानांमुळे वाहतूककोंडी होत आहे. पोलिस निरीक्षक भोयर यांनी थेट अतिक्रमणांवर हातोडा फिरवत परिसर मोकळा करण्याची धडक कारवाई केली होती तसेच अतिक्रमण करणाऱ्यांवर रितसर कारवाईचा बडगा उगारण्याची तंबी दिल्यानंतर सर्वांचे धाबे दणाणले होते. त्यामुळे परिसर वाहतुकीसह रहदारीसाठी मोकळा झाला या शिवाय मध्यवर्ती रिक्षास्टँडसाठी जागा निश्चित केली आहे. येथील वाहतुकीला शिस्त लागली आहे. पोलिसांच्या कडक भूमिकेमुळे वाहतूककोंडीचा प्रश्नदेखील निकाली निघाला आहे.
भरणे येथे यापूर्वी पोलिस चौकी अस्तित्वात होती. चौपदरीकरणात ती जमिनदोस्त केली होती. सद्यःस्थितीत येथे कधीतरी वाहतूक नियंत्रणासाठी पोलिस तैनात केले जात आहेत. त्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक भोयर यांनी वाहतूक नियंत्रणासह तत्सम घटनांवर देखरेख ठेवण्यासाठी भरणे येथील मध्यवर्ती ठिकाणी पोलिस चौकी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्गखात्याच्या अधिकाऱ्यांना येथे बोलावून रितसर चर्चाही केली आहे. लवकरच पोलिस चौकी उभारण्याबाबत सकारात्मक पावले टाकली जाणार असल्याचे दिसते.

चौकट
वाहतूककोंडीचा प्रश्न मार्गी लागणार
भरणे येथे पोलिस चौकीच्या उभारणीनंतर अपघातानंतर पोबारा करणाऱ्या वाहनचालकांना ताब्यात घेणे सोयीचे होणार आहे. भरणे येथील मध्यवर्ती ठिकाणाहून चारही बाजूंनी वाहने मार्गस्थ होतात. त्यामुळे बऱ्याचवेळा वाहतूककोंडी देखील होत आहेत. हा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com