वेळापत्रक पदलले

वेळापत्रक पदलले

कणकवलीत कचरा
संकलन विस्कळित

कणकवली, ता. २९ ः शहरातील ओला आणि सुक्या कचऱ्याची वेळेत उचल होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नगरपंचायतीने सतराही प्रभागांतील नागरिकांच्या घरोघरी जाऊन कचरा संकलनाचा ठेका दिला आहे. मात्र गेल्या आठवड्यापासून प्रभागात नियमित येणाऱ्या घंटागाडीचे वेळापत्रक बदलले आहे. त्यामुळे कामावर बाहेर जाणाऱ्या नागरिकांना घराबाहेर किंवा इमारतीबाहेर कचरा बादली ठेवावी लागते. अशा बादल्यांतील कचरा भटकी कुत्री विस्कटून टाकत आहेत. त्यामुळे रस्त्यावर कचरा पसरलेला असतो. तसेच वेळेत घंटागाडी येत नसल्याने नागरिक रात्रीच्या वेळी रस्त्यालगत कचरा फेकतात. परिणामी शहरातील रस्त्यालगत प्लास्टिकच्या पिशव्या आणि कचरा टाकलेला दिसत आहे. शहर आणि परिसरातील स्वच्छता करण्यासाठी ठेकेदाराकडे पुरेसे मनुष्यबळ आणि वाहने नाहीत. त्यामुळे सध्या अनियमितपणे शहरातील कचरा गोळा केला जात असल्याने नागरिकांची गैरसोय आणि शहरातील रस्त्यालगत कचरा फेकण्याची सवय वाढली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com