नाट्यस्पर्धेत रत्नागिरीचे ‘डबल गेम’ प्रथम

नाट्यस्पर्धेत रत्नागिरीचे ‘डबल गेम’ प्रथम

80549
रत्नागिरी ः येथील महावितरणच्या परिमंडलाच्या ‘डबल गेम’ नाटकास सांघिक नाट्य निर्मिती प्रथम क्रमांकाचे पारितोषिक महावितरणचे अरविंद भादीकर यांच्या हस्ते देण्यात आले.


नाट्यस्पर्धेत रत्नागिरीचे ‘डबल गेम’ प्रथम

महावितरणतर्फे आयोजन; रत्नागिरीत रंगली तीन दिवस स्पर्धा

कणकवली, ता. २९ ः महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभाग अंतर्गत आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेत रत्नागिरी परिमंडलाच्या ‘डबल गेम’ या नाटकाने सांघिक नाट्य निर्मिती प्रथम क्रमांकासह वैयक्तिक गटात सहा पारितोषिके पटकावली. ‘एकेक पान गळावया’ या प्रकाशगड, मुंबई मुख्यालयाच्या नाटकास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक ‍मिळाले. महावितरणचे संचालक अरविंद भादीकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात तीन दिवसीय नाट्यस्पर्धा झाली.
यावेळी संयोजक तथा मुख्य अभियंता परेश भागवत, मुख्य अभियंता दीपक कुमठेकर (नाशिक परिमंडल), मुख्य अभियंता कैलास हुमणे (जळगाव परिमंडल), अधीक्षक अभियंता स्वप्नील काटकर, अधीक्षक अभियंता विनोद पाटील, नाट्य परिक्षक विश्वास पांगारकर, मंजुषा जोशी, प्रदीप तुंगारे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक, सूत्रसंचालन करून आभार उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अप्पासाहेब पाटील यांनी मानले.
स्पर्धेचा निकाल असा ः वैयक्तिक गटात अभिनय (पुरुष) - प्रथम- दुर्गेश जगताप (डबल गेम, रत्नागिरी), द्वितीय- किशोरकुमार साठे (एकेक पान गळावया, प्रकाशगड, मुंबई), अभिनय (स्त्री) - प्रथम- रेणुका सूर्यवंशी (द ग्रेट एक्स्चेंज, नाशिक), द्वितीय - श्रद्धा मुळे (डबल गेम, रत्नागिरी), अभिनय उत्तेजनार्थ- अलका कदम (एकेक पान गळावया, प्रकाशगड, मुंबई), मकरंद जोशी (द ग्रेट एक्स्चेंज, नाशिक), युगंधरा ओहोळ (‘म्याडम’, जळगाव), दीपाली लोखंडे (ऑक्सिजन, कल्याण), डॉ. संदीप वंजारी (‘द रेन इन द डार्क’, भांडूप), अनुराधा गोखले (डबल गेम, रत्नागिरी), अभिनय बालकलाकार उत्तेजनार्थ - संयुक्ता राऊत, समर्थ जाधव, पूर्वा जाधव, शुभांगी भोई (‘म्याडम’, जळगाव), दिग्दर्शन- प्रथम - राजीव पुणेकर (डबल गेम, रत्नागिरी), द्वितीय - विनोद गोसावी (एकेक पान गळावया, प्रकाशगड, मुंबई), नेपथ्य- प्रथम - राजेंद्र जाधव (डबल गेम, रत्नागिरी), द्वितीय - संदेश गायकवाड (एकेक पान गळावया, प्रकाशगड, मुंबई), प्रकाशयोजना- प्रथम - अमोल जाधव (एकेक पान गळावया, प्रकशगड, मुंबई), द्वितीय - डॉ. प्रदीप निंदेकर, योगेश मांढरे (‘द रेन इन द डार्क’, भांडूप), पार्श्वसंगीत- प्रथम - नितीन पळसुलेदेसाई, राजीव पुणेकर (डबल गेम, रत्नागिरी), द्वितीय - देवेंद्र उंबरकर, अविनाश गोसावी (‘द रेन इन द डार्क’, भांडूप), रंगभूषा व वेशभूषा- प्रथम - हेमंत पेखळे (द ग्रेट एक्स्चेंज, नाशिक), द्वितीय - रवींद्र चौधरी, सचिन भावसार (‘म्याडम’, जळगाव).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com