कोलगाव-नाईकबाग येथे
संरक्षक भिंतीची मागणी

कोलगाव-नाईकबाग येथे संरक्षक भिंतीची मागणी

कोलगाव-नाईकबाग येथे
संरक्षक भिंतीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २९ ः कोलगाव-नाईकबाग येथील ग्रामस्थांना वाहतुकीसाठी रस्ता उपलब्ध नसल्याने व पावसाळ्यात जवळच असलेल्या वहाळाच्या पुरामुळे मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तात्काळ रस्ता व वहाळाच्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधून मिळावी, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते सुयोग मुवालीक यांनी प्रशासनाकडे केली आहे.
याबाबत त्यांनी पालकमंत्री, गटविकास अधिकारी, तहसीलदार यांना निवेदन सादर केले आहे. यात असे म्हटले आहे की, कोलगाव-नाईकबाग या ठिकाणी आमची ६ घरे असून गेली अनेक वर्षे रस्ता उपलब्ध नसल्याने व वहाळाला संरक्षण भिंत नसल्याने येथील ग्रामस्थांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबद्दल अनेकवेळा निवेदन देऊन देखील शासनाकडून फक्त आश्वासने मिळाली आहेत. त्यामुळे आमच्याकडे विशेष गांभीर्याने लक्ष देत पावसापूर्वी आम्हाला रस्ता व संरक्षण भिंत करून मिळावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com