तळवडेतील अपहाराची सखोल चौकशी करा

तळवडेतील अपहाराची सखोल चौकशी करा

तळवडेतील अपहाराची सखोल चौकशी करा
उपोषणाचा इशारा ः जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २९ ः तळवडे (ता. सावंतवाडी) ग्रामपंचायत अपहारप्रकरणी नियुक्त केलेल्या चौकशी समिती प्रमुख व सदस्य यांच्यासह संबंधितांची सखोल चौकशी करावी, या मागणीसाठी निरवडे (ता. सावंतवाडी) येथील सौ. श्रीमती लक्ष्मण गावडे यांनी १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना आज सादर केले.
सौ. गावडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, ‘तळवडे ग्रामपंचायत आर्थिक अपहारप्रकरणी माजी आमदार राजन तेली यांनी १४ डिसेंबर २०२३ ला तक्रारपत्र दिल्यानंतर गटविकास अधिकारी यांनी सहाय्यक गटविकास अधिकारी सावंतवाडी यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली चार सदस्य चौकशी समिती नेमली. त्यानंतर चौकशी समितीचे प्रमुख यांनी दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने अन्य चार सदस्य वाढवून देण्यात आल्याचे समजते. या समितीने २०२१-२२ व २०२२-२३ मधील १४ वा वित्त आयोग ग्राम निधी अंतर्गत २०२१-२२ व २०२२-२३ या वित्तीय वर्षात संशयित अपहार रक्कम ६ लाख ५५ हजार ९४३ कायम अपहार व इतर अपहर रक्कम ६५ लाख ३६ हजार ३८३ असे मिळून एकूण ७२ लाख ८१ हजार ०७६ रुपये एवढा अपहार झाल्याचे नमूद केले आहे. त्यावरून गटविकास अधिकारी पंचायत समिती यांनी आपल्या स्वयं स्पष्ट अभिप्रायासह २३ जानेवारी २०२४ ला मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्रथमदर्शनी अहवाल सादर केला आहे. मात्र, या चौकशीचे समिती प्रमुख व अन्य सदस्य यांनी केलेली तपासणी मुळात संशयास्पद आहे. कारण, या तपासणी प्रमुखांच्या समितीला ग्रामपंचायत कर्मचारी यांनी फाईव्ह स्टार सुविधा, जेवण, नाश्ता, पाणी पुरविल्या असल्याच्या बाबी एकंदरीत दिसून येतात. एवढा अपहार होत असेल तर विस्तार अधिकारी ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी पंचायत समिती सावंतवाडी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) हे पर्यवेक्षीय अधिकारी म्हणून त्यांना चौकशी अहवालात चौकशी प्रमुख यांनी जबाबदार का धरले नाही, त्यांची पर्यवेक्षणीय अधिकारी म्हणून जबाबदारी नाही का, त्यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत यांनी संयुक्त सहीने गुन्हा नोंद करण्याचे आदेश निर्गमित केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्यानुसार संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा, असा स्पष्ट उल्लेख आहे. मात्र, गुन्हा दाखल करण्याबाबतचे आदेश पारित झाले. त्यामध्ये कोठेही अन्य प्राधिकरणाच्या अहवालामध्ये विभागीय चौकशीमध्ये गुन्हा घडल्याबाबतचे स्पष्ट निष्कर्ष काढले असल्याबाबत आदेशात कोठेही उल्लेख नाही ही बाब संशयाला वाव देणारी आहे. एवढा मोठा अपहार होत असताना सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांचे संयुक्त खाते असताना केवळ अधिकाऱ्यालाच त्या अपहाराला जबाबदार धरले आहे. तरी या आर्थिक अपहाराची सखोल चौकशी करावी. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत चौकशी समिती प्रमुखांसह अन्य समिती सदस्यांना कोणतीही पदोन्नती देण्यात येऊ नये.'' याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी १ मेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे सौ. गावडे यांनी निवेदनात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com