कणकवलीत ४५३ कर्मचाऱ्यांचे 
पहिल्या टप्प्यात टपाली मतदान

कणकवलीत ४५३ कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यात टपाली मतदान

कणकवलीत ४५३ कर्मचाऱ्यांचे
पहिल्या टप्प्यात टपाली मतदान

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता २९ : लोकसभा निवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील ७०० कर्मचाऱ्यांपैकी आज ४५३ कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान करण्यात आले.
कणकवली विधानसभा मतदारसंघासाठी १६०० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यातील पहिल्या टप्प्याच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम आज घेण्यात आला. शहरातील भगवती मंगल कार्यालयात आयोजित या प्रशिक्षणाला ७०० कर्मचारी होते. जे कर्मचारी या मतदारसंघाबाहेर मतदान करणार आहेत. अशांना यापूर्वी अर्ज भरून माहिती घेण्यात आली होती. उपस्थित असलेल्या सातशेपैकी ४५३ कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. लोकसभेसाठी सात मे रोजी मतदान होणार असून, राज्यातील १२ मतदारसंघात एकाच वेळी मतदान होणार आहे. त्यामुळे जे कर्मचारी या मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांवर नेमले आहेत. अशांना आज टपाली मतदान घेण्यात आले. दुसऱ्या टप्प्याचे प्रशिक्षण उद्या (ता. ३०) येथे होणार आहे. यावेळी उर्वरित कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान घेण्यात येणार आहे. गुप्त पद्धतीने ही प्रक्रिया राबविली असून त्या-त्या मतदारसंघांमध्ये टपाली मते पाठविली जाणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com