मराठे महाविद्यालयात कार्यक्रम

मराठे महाविद्यालयात कार्यक्रम

१८ (टूडे पान ३ साठी)

- rat३०p९.jpg -
२४M८०६८८
राजापूर : मराठे महाविद्यालयातील कार्यक्रमात बोलताना जगदीश भालशंकर. या वेळी उपस्थित प्रा. डॉ. राजाराम राठोड आणि मान्यवर.

नव्या शैक्षणिक धोरणावर कार्यक्रम

मराठे महाविद्यालयात आयोजन; मान्यवरांचे मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३० : रयत शिक्षणसंस्थेच्या तालुक्यातील विखारेगोठणे येथील आबासाहेब मराठे महाविद्यालयात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात ''स्कूल कनेक्ट प्रोग्राम’ हा उपक्रम नुकताच झाला. या वेळी राजापूर हायस्कूलचे मुख्याध्यापक जगदीश भालशंकर यांनी नवीन धोरणाचे स्वरूप अन् रचना या विषयी माहिती दिली तसेच वरिष्ठ महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमामध्ये होणारे बदल मांडले.
आबासाहेब मराठे महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, महाविद्यालय प्रवेश समिती आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थी आणि पालकांसाठी नुकताच मराठे महाविद्यालयामध्ये ''स्कूल कनेक्ट प्रोग्राम’ आयोजित करण्यात आला होता. या वेळी नवजीवन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे मुरमुरे, मराठे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाराम राठोड आदी उपस्थित होते. महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. अतुल भावे यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांना असणारे विषय निवडीचे स्वातंत्र्य, वेगवेगळ्या विषयांनुसार होणाऱ्‍या श्रेयांक वर्गीकरणाची सविस्तर माहिती दिली तर प्रा. डॉ. राठोड यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची संरचना व त्याचा आराखडा सुलभ भाषेमध्ये उपस्थितांना समजावून सांगितला. तत्पूर्वी, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयातील ग्रंथपाल आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समितीचे प्रमुख अमर लोंढे यांनी केले. आभार महाविद्यालय प्रवेश समिती प्रमुख डॉ. बाबू सोनार यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मराठी विभागप्रमुख डॉ. संजय मेस्त्री यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व सेवक यांनी मेहनत घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com