रत्नागिरी - सीडकोरूपी राक्षसापासून कोकणचे रक्षण करू

रत्नागिरी - सीडकोरूपी राक्षसापासून कोकणचे रक्षण करू

८०७१०
रत्नागिरी ः येथील प्रचारसभेत बोलताना खासदार विनायक राऊत.

सीडकोरूपी राक्षसापासून
कोकणचे रक्षण करणार

विनायक राऊत; निर्यातीविषयीचे नियम शिथिल करू

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० ः सत्ताधाऱ्यांनी सिडकोचा राक्षस कोकणात आणला आहे. कोकणच्या या भूमीचे रक्षण करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे ती आम्ही चोखपणे बजावू आणि त्यासाठीच इंडिया आघाडीच्या माध्यमातून कोकण भगवेमय करूया, असा ठाम विश्‍वास रत्नागिरी-सिंधुदुर्गतील उमेदवार ठाकरे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.
रत्नागिरीतील जलतरण तलावाजवळ झालेल्या सभेत बोलत होते. ते म्हणाले, ‘‘विद्यमान सरकारला कोकणची भूमी ही सोन्याची कोंबडी वाटते. त्यामुळे ते अनेक संकटे लादू पाहत आहेत. कोकणातील आंबा, काजू बागायतदारांचा प्रश्‍न जैसे थे आहे. काजूला हमीभावाची मागणी बागायतदारांनी केली होती; मात्र विरोधी पक्षाचा खासदार मागणी करतोय म्हणून तो विषय बासनात गुंडाळून ठेवला. कोकणातील आंबा उत्पादक वाशीत हापूस विक्रीसाठी पाठवतात. तिथून निर्यात होते. त्याचबरोबर दर्जेदार काजू कोकणातून निर्यात केला जातो; मात्र गद्दार सरकारने निर्यातबंदी अधिक कडक केली आहे. त्यामुळे आफ्रिकेसह परदेशातील काजू कमी दराने कोकणात येऊ लागला आहे. त्यामुळे स्थानिक काजूला मागणी मिळत नाही. सत्तेत आल्यानंतर आघाडीचे सरकार कोकणातील आंबा, काजू बागायतदारांसाठीची निर्यातीविषयीचे नियम शिथिल करेल. कोकणातील चार जिल्ह्यातील १ हजार ६३५ गावांवर हद्दपार करण्याचा घाट घातला जात आहे. कोकणातील ६ लाख ४२ हजार हेक्टर जमीन परप्रांतियांच्या ताब्यात देण्याचा विचार सुरू आहे. त्यासाठी सिडकोचा आधार घेतला जात आहे. या सरकारने स्थानिक पातळीवर मिळणारा रोजगार हिसकावण्याचे काम केले आहे. त्याला आमचा ठाम विरोध आहे, असे राऊत यांनी सांगितले.
----
चौकट
छत्रपती शिवरायांची ‘मशाल’ पेटती ठेवा
कोकणची सेवा हाच आमचा धर्म आहे. त्यासाठी ‘मातोश्री’चा परिवार इथे ठाण मांडून आहे. कोकणाला कोणाची दृष्ट लागू देणार नाही. कोकण सुरक्षित ठेवण्याची हमी आपण सर्वांनी दिली पाहीजे. निष्ठावंत म्हणून प्राण आहे, तोपर्यंत कोकणचा सेवक राहीन आणि जगदंबेची, छत्रपती शिवाजी महाराजांची ‘मशाल’ पेटती राहील यासाठी आशीर्वाद द्या, असे आवाहन राऊत यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com