राजकीय पोळी भाजण्याचा काँग्रेसचा प्रयत्न

राजकीय पोळी भाजण्याचा काँग्रेसचा प्रयत्न

२४M८०७१८
चिपळूण ः नारायण राणे यांचे स्वागत करताना महायुतीचे पदाधिकारी.


राजकीय पोळी भाजण्याचा
काँग्रेसचा प्रयत्न ः राणे

सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३० ः देशात काँग्रेस राजवटीत तब्बल ८० वेळा भारतीय राज्यघटनेत किरकोळ स्वरूपाचे बदल करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधीही जातीधर्माचे राजकारण केलेले नाही. ते धर्माच्या नावाने कधी बोलत नाहीत. महिला, शेतकरी, तरुण आणि गरीब या चारच जाती त्यांनी मानून देशात विकासाचे काम सुरू ठेवले आहे; मात्र जातीधर्मात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न काँग्रेस तसेच इंडिया आघाडीकडून सुरू आहे, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी चिपळुणातील सभेत केले.
शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या प्रांगणात सोमवारी सायंकाळी महायुतीची जाहीर सभा झाली. या वेळी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे म्हणाले, देशासाठी ही निवडणूक महत्वाची असून ती गांभीर्याने घेण्याची गरज आहे. मोदी सरकारने कोरोना कालावधीत मोठे काम केले. लसीची निर्मिती करून ती भारतासह जगाला उपलब्ध करून दिली. देशातील ८० कोटी लोकांना २०२२ पासून मोफत धान्य दिले जात आहे; मात्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना कालावधीत बाहेर पडले नाहीत. आता भावनिक मुद्दे उपस्थित करून सहानुभूती मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
या प्रसंगी पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, दोन वर्षांपूर्वी चिपळूण पुरात बुडालेले असताना आणि माणसे मरत असताना सावर्डे येथे घेतलेल्या बैठकीत तत्कालीन पालकमंत्री हे चिपळूणला वाचवायचे सोडून मुंबईला कसे परत जाता येईल यासाठी प्रयत्न करत होते. महापुरानंतर चिपळूण उभा करण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न गाळ उपसा, शहर सुशोभीकरणासाठी महायुतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी चिपळूणसाठी दिला. या वेळी माजी आमदार सदानंद चव्हाण, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जयंद्रथ खताते, निलम गोंधळी, सुरेखा खेराडे, नितीन ठसाळे, मिलिंद कापडी, वसंत ताम्हणकर, आशिष खातू, संतोष नलावडे, संदेश आयरे, उमेश सकपाळ, दादा मर्चंडे, प्रीतम रूके, बाबू साळवी, दशरथ भोळकर, पूजा निकम आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com