हरवंदे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जांभारी शाळेला वाचनालय भेट

हरवंदे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जांभारी शाळेला वाचनालय भेट

rat30p7.jpg
M80816
रत्नागिरीः जांभारी शाळेला विठ्ठल रूक्मिणी हनुमान मंदिर विश्वस्त संस्थेतर्फे शाळेला वाचनालय भेट देण्यात आले.
--------

काही सुखद---लोगो

हरवंदे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जांभारी शाळेला वाचनालय भेट
४०० पुस्तकांचा समावेश; विठ्ठल रूक्मिणी हनुमान मंदिर विश्वस्त संस्थेतर्फे उपक्रम
रत्नागिरी, ता. ३०ः तालुक्यातील जांभारी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेला (कै.) आदिनाथ हरवंदे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विठ्ठल रूक्मिणी हनुमान मंदिर विश्वस्त संस्थेतर्फे शाळेला वाचनालय भेट देण्यात आले. ४०० पुस्तके व रॅक शाळेला भेट देण्यात आला. विविध साहित्य प्रकारातील विद्यार्थी वयोगटाला अनुरूप अशा पुस्तकांचा यामध्ये समावेश आहे.
हा कार्यक्रम अध्यक्ष समीर कोळेकर, सचिव गणेश डोयफोडे यांच्या सहकार्याने झाला. या वेळी (कै.) आदिनाथ हरवंदे यांच्या पत्नी गीता हरवंदे उपस्थित होते. आदिनाथ हरवंदे हे जांभारी गावचे सुपुत्र. त्यांनी धावपटू, विश्वचषक क्रिकेटचा जल्लोष, कसोटी क्रिकेट ते एकदिवसीय क्रिकेट, खेलरत्न महेंद्रसिंग धोनी आणि चौसष्ट घरांचा बादशहा विश्वनाथन् आनंद ही क्रीडाविषयक पुस्तके लिहिली आहेत. वलयांकित क्रिकेटपटू, कसोटी क्रिकेट ते एकदिवसीय क्रिकेट या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार तर खेलरत्न महेंद्रसिंग धोनी या पुस्तकाला अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्थेचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे.
लालबाग आणि जिगिषा या दोन्ही कलाकृतींना कोकण मराठी साहित्य परिषदेचा र. वा. दिघे स्मृतीपुरस्कार मिळाला आहे. जिगिषा या कादंबरीला मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे यांच्यावतीने वामन अनंत रेगे उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या कार्याची नव्या पिढीला माहिती व्हावी यासाठी संस्थेने हरवंदे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शाळेला वाचनालय भेट देण्यात आले. या वेळी गणपतीपुळे बीटच्या शिक्षणविस्तार अधिकारी सविता तोटावार, केंद्रप्रमुख स्मिता मांजरेकर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे रत्नागिरी कार्यवाह माधव अंकलगे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा पवित्रा कटनाक, मुख्याध्यापिका आकांक्षा भुर्के उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com