राणे भाजपचे तरी होणार का?

राणे भाजपचे तरी होणार का?

80825
देवगड ः येथे अतुल रावराणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बाजूला शिवसेना पदाधिकारी. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)


राणे भाजपचे तरी होणार
का? ः अतुल रावराणे

देवगड येथे प्रचार सभेत टीका

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३० ः नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी चुकीच्या उमेदवाराला येथील लोकसभा मतदारसंघात विजयी करणार का? केंद्रीयमंत्री नारायण राणे आजवर कुठल्याच पक्षाचे झाले नाहीत ते भाजपचे तरी होणार आहेत का? याचा विचार मुळ भाजप कार्यकर्त्यांनी करण्याची आवश्यकता आहे. या निवडणुकीत श्री. राणे यांचे राजकीय पुस्तक बंद झालेले असेल, असा विश्‍वास ठाकरे गट शिवसेना पक्षाचे नेते अतुल रावराणे यांनी येथे व्यक्त केला. विनायक राऊत यांच्या विजयाने शिवसेनेची नवी पहाट होईल, असा दावाही त्यांनी केला.
येथील संपर्क कार्यालयात श्री. रावराणे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी महिला तालुकाप्रमुख हर्षा ठाकूर, नगरसेवक संतोष तारी, निनाद देशपांडे, विकास कोयंडे आदी उपस्थित होते. श्री. रावराणे म्हणाले, ‘‘कोकणातील शिवसेना संपवण्याची यापूर्वीपासून नारायण राणे यांची भाषा असल्याने भाजपने राणे यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांच्या पराभवासाठी कोकणातील शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते पेटून उठले. राजकीय महत्वाकांक्षेपोटी त्यांनी उद्योजक किरण सामंत यांचा राजकीय बळी घेतला. त्यांचा वैभववाडीतील क्रशरसह साहित्याचे नुकसान कोणी केले याची माहिती सामंत बंधू यांना असेल ही बाब ते लक्षातही ठेवतील. बाळासाहेब ठाकरे यांनी श्री. राणे यांना सर्व पदे देऊन शिवसेना पक्षात मोठे केले. परंतु, ते शिवसेनेचेच काय पण पुढे काँग्रेसचेही राहिले नाहीत. भविष्यात भाजपलाही ते कळून चुकेल. त्यामुळे अशांना मोदी पंतप्रधान होणार म्हणून निवडून द्यायचे काय? याचा विचार भाजप कार्यकर्त्यांनी करावा.’’ ते म्हणाले, मागील ३४ वर्षांत सिंधुदुर्गात कोणताही विकास झाला नसताना पुन्हा राणेंना निवडून देऊन काय होणार आहे, यासाठी भाजपने लोकसभेसाठी अन्य नेतृत्व उभे करण्याची आवश्यकता होती.
---

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com