बसस्थानकाच्या नवीन इमारतीच्या कामाला गती

बसस्थानकाच्या नवीन इमारतीच्या कामाला गती

२२ (टूडे ३ साठी, अँकर)
-----------

- rat२p२२.jpg ः
P24M81041
चिपळूण ः चिपळुणातील बसस्थानकातील कामाने घेतलेला वेग.

बसस्थानकाच्या नवीन इमारतीच्या कामाला गती

चिपळूणमधील स्थिती; पायाचे काम सहा वर्षांनी पूर्ण, प्रवाशातून समाधान

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २ : नवीन ठेकेदार नियुक्तीमुळे चिपळूणमधील हायटेक बसस्थानकाच्या इमारतीच्या कामाला गती आली आहे. नवीन बसस्थानकाचा पाया पूर्ण करण्यासाठी सुमारे सहा वर्षे लागली. सध्या कॉलम उभारून त्यावर पहिला स्लॅब ओतण्यात आला आहे. पावसाळा तोंडावर असून काम वेगाने सुरू झाल्यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.
प्रवाशांना अत्याधुनिक सोईसुविधा पुरवण्याच्या उद्देशाने चिपळुणात हायटेक बसस्थानक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. २०१८ मध्ये चिपळूण आगाराची जुनी इमारत तोडण्यात आली. त्यानंतर लगेचच नवीन बसस्थानक इमारतकामाचे भूमिपूजनही धुमधडाक्यात करण्यात आले; मात्र प्रत्यक्ष कामाला मुहूर्तच मिळाला नाही. संबंधित ठेकेदाराने रडतरखडत कामाला सुरवात केली. कामाची बिले निघत नसल्याची कायम ओरड सुरू राहिल्याने या इमारत बांधकामाचे तीनतेरा वाजले. हे काम एसटी महामंडळासह लोकप्रतिनिधींमुळे दुर्लक्षितच राहिले. ठेकेदाराला पाच वर्षात साधा पायासुद्धा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. या संदर्भात शिवसेना उबाठा गटाचे तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी आवाज उठवला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. अखेर पहिला ठेकेदार बदलून नवीन ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली. नव्या ठेकेदाराने काम सुरू करताच बसस्थानकाचा पाया पूर्णत्वास नेण्यावर भर दिला. काही महिन्यातच बसस्थानकाचा पाया पूर्ण करण्यासाठी कॉलम उभारण्यात आले तसेच पहिला स्लॅबदेखील पडला आहे. लवकरात लवकर या बसस्थानकाची इमारत उभी राहावी, अशी आशा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

प्रवाशांना सोईसुविधा मिळणार
चिपळुणात निर्माण होत असलेल्या हायटेक बसस्थानकामुळे प्रवाशांना अत्याधुनिक सेवासुविधा मिळणार आहे. त्यामुळे या इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी प्रवाशांकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com