रॅपिड स्पर्धेत सौरीश कशेळकर विजयी

रॅपिड स्पर्धेत सौरीश कशेळकर विजयी

२४ (टूडे पान ३ साठी)

- rat२p१७.jpg -
२४M८१००८
राजापूर ः (कै.) वसंत आठल्ये स्मृती चषक भव्य खुल्या बुद्धिबळ रॅपिड स्पर्धेतील विजेत्यांसमवेत मान्यवर.

रॅपिड स्पर्धेत सौरीश कशेळकर विजयी

बुद्धिबळ स्पर्धा ; तालुका गटात अथर्व देसाई विजयी

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २ ः सँटिनरी चेस क्लब गोवा व राजापूर रॉयल चेस अ‍ॅकॅडमीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या खुल्या बुद्धिबळ रॅपिड स्पर्धेत सर्वाधिक गुण मिळवत रत्नागिरीच्या सौरीश कशेळकर याने तर तालुकास्तरीय गटात अथर्व देसाई याने विजेतेपदाचा मान पटकावत (कै.) वसंत आठल्ये स्मृती चषकावर नाव कोरले.
या स्पर्धेतील विजेत्यांना टुर्नामेंट डायरेक्टर प्रकाश कातकर, गोवा चेस असोसिएशनचे प्रेसिडेंट किशोर बांदेकर, लेखिका वृषाली आठल्ये, राजापूर प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन पाडावे यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. खुला गट आणि तालुका मर्यादित अशा दोन गटात झालेल्या स्पर्धेमध्ये खुल्या गटात चिपळूणच्या मिलिंद नरवणकर यांनी द्वितीय, रत्नागिरीच्या सुहास कामतेकर यांनी तृतीय, चिपळूणच्या प्रवीण सावर्डेकर यांनी चतुर्थ तर रत्नागिरीच्या यश गोगटे यांनी पाचवा क्रमांक पटकावला. राजापूर तालुकास्तरीय गटात गुरूप्रसाद साळवी व राजेंद्र साळवी यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. १५ वर्षांवरील महिला गटात प्रज्ञा साळवी यांनी तर ज्येष्ठ नागरिक गटात सुनील शिंदे यांनी विजेतेपद पटकावले. खुल्या गटात ९ वर्षांखालील गटात श्रेया बांदोडकरने प्रथम तर हेमांग मराठे व सार्थक जोशी यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. ११ वर्षांखालील गटात रूद्राक्ष राठोड, निर्झरा हुंबे, पार्थ कुडतरकर, मिहीर जाधव, सन्मीत साटेलकर यांनी अनुक्रमे प्रथम पाच क्रमांक पटकावले. १३ वर्षांखालील गटात तनिष्क अडेलकर, रूद्रा मोबरकर, शुभम बांदोडकर, मन्वीत कांबळे, गौरेश तायशेट्ये यांनी तर १५ वर्षांखालील गटात मिनल सुलेभावी, वरद तावडे, हर्षवर्धन भिंगे, केदार कांबळे, अर्जुन साळुंखे यांनी विजेतेपदे पटकावले. राजापूर तालुकास्तरीय ९ वर्षांखालील गटात चिन्मय बाकाळकर याने प्रथम तर मयंक बोटले याने द्वितीय क्रमांक पटकावला. ११ वर्षांखालील गटात ईश्वरी सप्रे, देवांश शिंदे, सान्वी सरखोत, नील कुडाळी, वेदांती दांडेकर यांनी विजेतेपद पटकावले. १३ वर्षांखालील गटात यश कातकर, स्वस्तिक कुवळेकर, आदित्य तेली, गार्गी सावंत, प्रसाद गाडगीळ यांनी यश मिळवले. १५ वर्षांखालील गटात शुभम बावधनकर, सोहम बावधनकर, चिराग प्रभुदेसाई, अथर्व गुरव, सोहम साळे यांनी यश मिळवले. टुर्नामेंट ऑर्बिटर तनिष कुवळेकर यांनी काम पाहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com