रामेश्वर मंदिरात कार्यक्रम

रामेश्वर मंदिरात कार्यक्रम

३२ (पान ५ साठी)

गोवळ-मधलीवाडीतील
रामेश्वर मंदिरात कार्यक्रम

राजापूर, ता. २ः सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने तालुक्यातील गोवळ-मधलीवाडी येथील नवतरुण मित्रमंडळ यांच्यावतीने श्री देव रामेश्‍वर मंदिरामध्ये बुधवारी (ता. १ मे) श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. त्या निमित्ताने सकाळी ८ वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वा. तीर्थप्रसाद, १ वा. महाप्रसाद, १.३० वा. हळदीकुंकू, सायंकाळी ६ वा. गांगेश्‍वर ढोलपथक-कुणकवण, खारेपाटण यांचे ढोलवाद्य, रात्री १० वा. शक्तीवाले शाहीर सचिन कदम विरुद्ध तुरेवाले शाहीर देवेंद्र झिमण यांचा शक्तीतुराचा जंगी सामना झाला..
-----
- rat२७p५.jpg ः
24M80126
डॉ. पी. एस. मेश्राम

मुंबई विद्यापीठ कमिटी
सदस्यपदी डॉ. मेश्राम

राजापूर ः तालुक्यातील रायपाटण येथील मनोहर हरी खापणे महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. पी. एस. मेश्राम यांची मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या रिसर्च अ‍ॅडव्हायझरी कमिटीच्या सदस्यपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. मेश्राम पीएचडी मार्गदर्शक म्हणूनही काम करत आहेत. त्यांच्या झालेल्या या नियुक्तीबद्दल संस्थाध्यक्ष मनोहर खापणे, सरचिटणीस चंद्रकांत लिंगायत, सर्व संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. येल्लुरे, प्राध्यापकृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com