कणकवली :ध्वजारोहण

कणकवली :ध्वजारोहण

kan22.jpg
81089
भिरवंडेः गावातील शेतकरी आनंद सावंत यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.

-----
भिरवंडेमध्ये शेतकऱ्याला
ध्वजवंदनाचा मान
कणकवली, ता. २ : महाराष्ट्रदिनानिमित्त तालुक्यातील भिरवंडे ग्रामपंचायत येथे ध्वजवंदनाचा मान मुरडवेवाडी येथील शेतकरी, कामगार व सामाजिक कार्यकर्ते आनंद रामकृष्ण सावंत यांना देण्यात आला. गावातील समस्त शेतकरी व कामगार कष्टकरी यांचा आदर राखताना व समाज सेवेत अनेक वर्षे कार्यरत असलेल्या आनंद सावंत यांना हा सन्मान देण्यात आला असल्याचे सरपंच नितीन सावंत यांनी सांगितले.
भिरवंडे ग्रामपंचायतीमध्ये समाजातील वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना ध्वजवंदनाचा मान दिला जातो. महाराष्ट्र दिनी व कामगार दिनी हीच परंपरा कायम राखण्यात आली. यावेळी केंद्रप्रमुख श्री. सुर्यवंशी, प्रकाश घाडीगांवकर, दिगंबर सावंत, अरविंद सावंत, राजू कांबळे, मंगेश सावंत, जगन्नाथ गावकर, विशाल सावंत, ऋषिकेश सावंत, दिलीप पवार, सुरेखा सावंत, विनिता सावंत. मनीषा सावंत आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com