स्वरूपानंद विद्यामंदिरमध्ये राणी लक्ष्मीबाई पुस्तकांचे वितरण

स्वरूपानंद विद्यामंदिरमध्ये राणी लक्ष्मीबाई पुस्तकांचे वितरण

पान २

८०९९७

स्वरूपानंद विद्यामंदिरमध्ये
राणी लक्ष्मीबाई पुस्तकांचे वितरण
पावस, ता. २ : बडोदा, इंदूर, निजाम व ग्वाल्हेरचे शिंदे आदी मोठ्या संस्थानिकांनी इंग्रजांशी संधान बांधले; परंतु झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंनी धैर्य, पराक्रम, जिद्दीने इंग्रजांशी अतुलनीय लढा दिला. राणीने बाईपणाचे ओझे कधीच बाळगले नाही. स्वराज्याची कल्पना राणींनी या भूमीवर प्रथम मांडली आणि स्वातंत्र्याकरिता धगधगत्या अग्निकुंडात उडी घेतली. प्रसंगी इंग्रजांशी तडजोड करून राणीना झांशी संस्थान वाचवता आले असते; परंतु तडजोड, माघार हे शब्द राणींच्या शब्दकोशात नव्हते, असे प्रतिपादन रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांनी केले.
स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिरमध्ये राणी लक्ष्मीबाई पुस्तके विद्यार्थ्यांना वितरित करण्याचा कार्यक्रम महाराष्ट्रदिनी (ता. १) झाला. त्या वेळी ते बोलत होते. मुलांनी आपली क्षमता ओळखून स्वप्नं सत्यात आणली पाहिजेत तसेच वाचनावर भर दिला पाहिजे, असे पाटणे यांनी सांगितले. संजय वैशंपायन यांनी मुलांमध्ये वाचनाची आवड वाढावी यासाठी स्पर्धेसाठी बक्षिसे प्रायोजित केली. मुख्याध्यापक माने यांनी प्रास्ताविक केले. एनएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात सातत्याने तीन वर्ष प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रशालेतील प्रथम क्रमांक आदिती आंब्रे हिचा सत्कार करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com