''राज ठाकरेंचे बांद्यात जल्लोषी स्वागत करणार''

''राज ठाकरेंचे बांद्यात जल्लोषी स्वागत करणार''

‘राज ठाकरे यांचे बांद्यात
जल्लोषी स्वागत करणार’
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २ः भाजप महायुतीचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी येणारे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे शनिवारी (ता. ४) सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. त्यांचे सायंकाळी ३ वाजता बांदा येथे ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती मनसेचे सावंतवाडी तालुका प्रमुख मिलिंद सावंत यांनी दिली.
राज ठाकरे यांची कणकवली येथे भव्य प्रचारसभा होणार आहे. यासाठी ते गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत. सिंधुदुर्ग गोवा सीमेवर बांदा शहरात त्यांचे भव्य स्वागत करण्याचे नियोजन सिंधुदुर्ग जिल्हा मनसेच्या वतीने करण्यात आले आहे. ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनसेचे सर्व पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती सावंत यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com