श्री समर्थ डेव्हलपर्सच्या मंदिराचे आज उद्घाटन

श्री समर्थ डेव्हलपर्सच्या मंदिराचे आज उद्घाटन

४४ (पान २ किंवा ५ साठी)

-ratchl२४.jpg-
P२४M८११२५
चिपळूण ः कापसाळ डिगेवाडी येथील श्री गणेशमंदिर.
-------------
श्री समर्थ डेव्हलपर्सच्या मंदिराचे आज उद्घाटन

चिपळूण ः शहरानजीकच्या कापसाळ येथील श्री समर्थ गृहसंकुलामध्ये उभारण्यात आलेल्या श्री गणेशमंदिराचा कलशारोहण व प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या दिमाखात होत आहे. या निमित्त गुरूवारी कापसाळ येथे ढोलताशाच्या गजरात श्री गणेशमूर्तीची व कलशाची मिरवणूक मंदिरापर्यंत काढण्यात आली. शुक्रवारी (ता. ३) दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या निमित्त सकाळी ६ वा. गंगा आणून गंगापूजन केले जाणार आहे. त्यानंतर धार्मिक कार्यक्रम होतील. सकाळी दहा वाजता होमहवन, ११ वा. श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा व कलशावर अभिषेक केला जाईल. ११ वाजून ४५ मिनिटांनी भारती महाराज (आळंदी) यांच्या हस्ते कलशारोहण होईल. दुपारी १२.३० वा. महाआरती होईल. एक वाजता महाप्रसाद होणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राधाकृष्ण मित्रमंडळ, राधाकृष्ण क्रीडामंडळ, राधाकृष्ण महिला मंडळ, राधाकृष्ण ढोलपथक कापसाळ डीगेवाडी, स्वयंभू मित्रमंडळ कापसाळ फणसवाडी आणि ओबामा ग्रुप मेहनत घेत आहेत. या वेळी श्री गणेश दर्शनासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रमेश चव्हाण आणि रमाकांत पांचाळ यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com