कणकवली : प्रौढाची आत्‍महत्‍या

कणकवली : प्रौढाची आत्‍महत्‍या

असलदे बौद्धवाडी येथे
प्रौढाची आत्‍महत्‍या
कणकवली, ता. २ : तालुक्‍यातील असलदे बौद्धवाडी येथे अनंत सखाराम तांबे (वय ६२) यांनी आज गळफास लावून आत्‍महत्‍या केली. दुपारी अडीचच्या सुमारास ही बाब उघडकीस आली. या प्रकरणी त्यांचा मुलगा पवन याने कणकवली पोलिसांत फिर्याद दिली.
दुपारी दोनच्या सुमारास त्‍यांच्या कुटुंबातील सर्व व्यक्‍ती जेवणाला बसल्‍या होत्‍या. त्‍यावेळी अनंत तांबे हे घरी आले. त्‍यानंतर थोड्यावेळाने येतो असे सांगून बाहेर निघून गेले. जेवण आटोपल्‍यानंतर पवन याची आई त्यांना शोधण्यासाठी गेली असता घरालगतच्या गोठ्याच्या वाशाला अनंत हे गळफास लावलेल्‍या स्थितीत आढळून आले. त्‍यानंतर पवन याने वडिलांना गळफासावरून काढून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे ते असलदे सोसायटीचे विद्यमान संचालक म्हणून कार्यरत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com