मानधन तत्त्वावरील शिक्षक कार्यमुक्त

मानधन तत्त्वावरील शिक्षक कार्यमुक्त

३९ ( पान ३ साठी)

मानधन तत्त्वावरील शिक्षक कार्यमुक्त

स्थानिक भरडले ; बेरोजगारीची समस्या
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २ ः मानधन तत्त्वावरील शिक्षकाना कार्यमुक्त करण्यात आल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. नवीन शैक्षणिक वर्षांत पुन्हा १२०० पेक्षा जास्त पदे रिक्त असणार आहेत. अशी परिस्थिती असतानाही मानधन तत्त्वावरील शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेमधील शिक्षण विभागात जवळपास दोन हजारपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. जून २३ मध्ये झालेल्या ७०० शिक्षकांच्या जिल्हा बदलीमुळे शाळा उघडण्यासाठी शिक्षक नव्हते. अनेक शाळा शुन्य शिक्षकी झाल्या. शिक्षण विभाग अडचणीत आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार नऊ हजार रुपये मानधन देऊन स्थानिक डीएड, बीएड पदवीधारकांना शिक्षक म्हणून नेमणूका देण्यात आल्या. शैक्षणिक धोरणानुसार टीईटी तसेच डीएड, बीएड नसलेल्या शिक्षकांनी या शैक्षणिक वर्षात उत्तम काम केले. शैक्षणिक दर्जा उत्तम राखला. मात्र आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून १०३४ शिक्षकांची भरती अंतिम टप्प्यात आहे. हे शिक्षक नवीन शैक्षणिक वर्षांत उपलब्ध होतील. नव्याने ३४३ शिक्षकांच्या जिल्हा बदलीचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यांना देखील कार्यमुक्त करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षांत पुन्हा १२०० पेक्षा जास्त पदे रिक्त असणार आहेत. अशी परिस्थिती असताना मानधन तत्त्वावरील शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.
शेतकरी, कष्टकरी, गरीब मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत उत्तम शिक्षण मिळत आहे, परंतू शिक्षक नसल्यामुळे या मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मानधन तत्त्वावरील शिक्षकांना कार्यमुक्त केल्यामुळे स्थानिक नेत्यांबद्दल संताप व्यक्त होत आहे. स्थानिक नेते या शिक्षकांना आधार देणार की त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार हे पाहावे लागणार आहे की, रिक्त जागांवर पुन्हा नव्याने नियुक्ती करणार हे पहावे लागणार आहे.
----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com